रत्नागिरीतील संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करा-जिल्हाधीकाऱ्यांचे आदेश

रत्नागिरी जिल्ह्यात 4 हजार पैकी 3261 कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. संपामुळे जिल्ह्यातील एसटीच्या 2143 फेऱ्या रद्द झाल्या आहेत. संप नाही मिटला तर आज रात्री गुन्हे दाखल करण्याचे पत्र विभागीय नियंत्रकांकडून पोलिसांना दिले जाईल.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Oct 18, 2017 09:18 PM IST

रत्नागिरीतील संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करा-जिल्हाधीकाऱ्यांचे आदेश

रत्नागिरी,18 ऑक्टोबर:संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करा असे आदेश जिल्हाधिकारी प्रभाकर प्रदीप यांनी दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश एसटी विभागीय नियंत्रकाना दिले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात 4 हजार पैकी 3261 कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. संपामुळे जिल्ह्यातील एसटीच्या 2143 फेऱ्या रद्द झाल्या आहेत. संप नाही मिटला तर आज रात्री गुन्हे दाखल करण्याचे पत्र विभागीय नियंत्रकांकडून पोलिसांना दिले जाईल. दरम्यान राज्यभरात दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आधीच संपकरी कर्मचाऱ्यांना जेलमध्ये टाकायची धमकी दिली होती.

आता राज्य सरकार हा प्रश्न कसा सोडवतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 18, 2017 09:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...