लाभार्थी कमी झाले म्हणून कर्जमाफीच्या रकमेत 10,200 कोटींची कपात

लाभार्थी कमी झाले म्हणून कर्जमाफीच्या रकमेत 10,200 कोटींची  कपात

राज्याचे तब्बल 10 हजार 200 कोटी रुपये वाचले आहेत. त्यामुळे या योजनेसाठी प्रस्तावित 34 हजार 200 कोटींचा निधी कमी करून एकूण कर्जमाफी या घडीला 24 हजार कोटींची होणार आहे.

  • Share this:

07 डिसेंबर: लाभार्थी कमी झाल्यामुळे कर्जमाफीच्या प्रस्तावित रकमेत कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 89 लाख वरून 67 ला ख लाभार्थी शेतकऱ्यांची यादी अंतिम झाली आहे.

राज्याचे तब्बल 10 हजार 200 कोटी रुपये वाचले आहेत. त्यामुळे या योजनेसाठी प्रस्तावित 34 हजार 200 कोटींचा निधी कमी करून एकूण कर्जमाफी या घडीला 24 हजार कोटींची होणार आहे. दुसरीकडे या योजनेच्या लाभधारकांची तिसरी सुमारे 40 लाख शेतकऱ्यांची यादी आज किंवा उद्या म्हणजे या दोन दिवसात जाहीर केली जाणार आहे. तसंच उर्वरित चौथी आणि शेवटची यादी येत्या 8 दिवसात जाहीर करू, असं नव्याने आश्वासन सरकारने दिलं आहे.

लाभार्थ्यांची पहिली यादी 2 लाख 39 हजाराची तर दुसरी 15 लाख 42 हजार शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली.  तिसरी यादी साधारण 40 लाख शेतकऱ्यांची आहे, उर्वरित सर्व शेतकऱ्यांची अंतिम यादी एका आठवड्यात जाहीर होईल अशी हमी सरकारने पुन्हा दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 7, 2017 09:27 AM IST

ताज्या बातम्या