मोदींनी 12 तास चौकीदाराची ड्युटी करुन दाखवावी, खऱ्या खुऱ्या चौकीदाराचं आव्हान

पुण्यात काँग्रेसने आपला जाहीरनामा खऱ्या खुऱ्या चौकीदाराच्या हस्ते प्रकाशित केला. ज्या चौकीदाराच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं त्यानं मोदींनी 12 तास चौकीदाराची ड्युटी करुन दाखवावी, असं आव्हान दिलं आहे

News18 Lokmat | Updated On: Apr 16, 2019 02:53 PM IST

मोदींनी 12 तास चौकीदाराची ड्युटी करुन दाखवावी, खऱ्या खुऱ्या चौकीदाराचं आव्हान

पुणे, १६ एप्रिल- पुण्यात काँग्रेसने आपला जाहीरनामा खऱ्या खुऱ्या चौकीदाराच्या हस्ते प्रकाशित केला. ज्या चौकीदाराच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं त्यानं मोदींनी 12 तास चौकीदाराची ड्युटी करुन दाखवावी, असं आव्हान दिलं आहे. मोहम्मद इस्माईल सिकंदर शेख  या चौकीदाराचे नाव आहे. मोहम्मद इस्माईल सिकंदर शेख म्हणाले की, ते मागील सात वर्षांपासून चौकीदारीचे नोकरी करत आहेत. परंतु त्यांना कोणी बदनाम केले नाही. नरेंद्र मोदी हे स्वत:ला 'चौकीदार' म्हणतात. मात्र त्यांना काय माहीत १२ तासांची चौकीदाराची ड्युटीबाबत. चौकीदारी काय असते, हे मोदींनी आम्हाला सांगू नये.

यावेळी पुणे लोकसभा मचदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी, शहर अध्यक्ष रमेश बागवे व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

'चौकीदार चोर है', असं म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी 'राफेल'वरून संपूर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात रान उठवलं आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या या कृतीची चांगलीच चर्चा रंगली आहे.

नरेंद्र मोदी रात्री पुण्यात मुक्कामी

विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी यांची बुधवारी अकलूजमथ्ये  जाहीर सभा आहे. त्या आधी मोदी पुण्यात मंगळवारी रात्री मुक्कामाला येत आहेत. भाजपच्या पुणे जाहिरनाम्याचं त्यांच्याहस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे.

अमित शहांची शारदा प्रागंणात सभा

अमित शहा यांची बारामतीतील शारदा प्रागंणात येत्या १९ एप्रिल रोजी सभा होणार आहे. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची २१ एप्रिल रोजी होणार आहे. दुसरीकडे, उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळतोय. मोदींनंतर भाजपचे तेच 'स्टार प्रचारक' आहे. त्यामुळे भाजपने त्यांची एक सभा खडकवासला विधानसभा मतदारसंघात आयोजित केली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी विधानसभा निवडणुकीच्या वेळी बारामतीत प्रचार सभा घेतली होती.


VIDEO: रितेश देशमुखही प्रचाराच्या मैदानात; पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 16, 2019 02:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close