S M L

कोरेगाव भीमा प्रकरण : कोण काय म्हणालं?

एकीकडे महाराष्ट्रात ताण तणाव वाढत असताना देशभरातील वेगवेगळ्या नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या सगळ्या प्रतिक्रिया जाणून घेऊ या

Chittatosh Khandekar | Updated On: Jan 2, 2018 09:47 PM IST

कोरेगाव भीमा प्रकरण : कोण काय म्हणालं?

02  जानेवारी : भीमा-कोरेगाव येथे झालेल्या लढाईच्या 200 व्या  विजयोत्सवात झालेल्या  दगडफेकीमुळे राज्यभरातलंच नाही तर देशभरातीलच राजकारण तापलं आहे. एकीकडे महाराष्ट्रात तणावपूर्ण शांतता आहे. या प्रकरणाावर देशभरातील वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या सगळ्या प्रतिक्रिया जाणून घेऊ या...

पोलिसांची भूमिका संशयास्पद - प्रकाश आंबेडकर  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू  आणि  भारिपचे अध्यक्ष प्रकाश  आंबेडकर  हे काल  भीमा  कोरेगावला घटनास्थळी उपस्थित होते. याप्रकरणी पोलीस आणि प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसंच या प्रकरणी चौकशी व्हावी अशी मागणीही केली त्यांनी केली आहे. दरम्यान, याप्रकरणी  निषेध करण्यासाठी उद्या त्यांनी महाराष्ट्रव्यापी बंद पुकारला आहे.


दलित समाजाला वर येऊ न देणे हाच संघाचा मुळ विचार-राहुल गांधी

  दलितांना  समाजात  वर येऊ न देणे हाच संघाच्या विचाराचा गाभा आहे अशी सणसणाती टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.  तसंच ऊना,वेमुला,कोरेगाव भीमा हे दलित प्रतिकाराची प्रतिकं असल्याचं विधान ही त्यांनी केलं आहे.

Loading...

A central pillar of the RSS/BJP’s fascist vision for India is that Dalits should remain at the bottom of Indian society. Una, Rohith Vemula and now Bhima-Koregaon are potent symbols of the resistance.

— Office of RG (@OfficeOfRG) January 2, 2018

असा प्रकार आधी कधीच घडला नाही -शरद पवार

 कोरेगाव  भीमाला जे आज झालं तो प्रकार आधी कधी घडलाच नाही. दरवर्षी  हा  सोहळा शांततेत पार पडतो. तरी जातीय विखार पसरू न देता सामंजस्याने हे प्रकरण सांभाळायला हवं  असं आवाहनही त्यांनी सर्वांना केलं आहे.

या हिंसेमागे संघ-भाजपचाच हात-मायावती

या प्रकरणी  झालेल्या हिंसेमागे संघ भाजपचाच हात असल्याची शंका बहुजन समावादी पक्षाच्या नेत्या मायावती यांनी केली आहे. तसंच हा प्रकार थांबवला गेला असता पण महाराष्ट्रात भाजपचे सरकार आहे. त्यांनी ते थांबवलं नाही. या साऱ्यामागे त्यांचाच हात असणार अशी टीका त्यांनी केली आहे.

Yeh jo ghatna ghati hai yeh roki ja sakti thi. Sarkaar ko wahan suraksha ka uchit prabandh karna chahiye tha. Wahan BJP ki sarkaar hai aur unhone wahan hinsa karayi, lagta hai iske peeche BJP,RSS aur jaati wadi takaton ka haath hai: BSP Chief Mayawati on #BhimaKoregaonViolencepic.twitter.com/RZAPKYsYWr

— ANI UP (@ANINewsUP) January 2, 2018

दोषींवर कठोर कारवाई करा-रामदास आठवले

 रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी  दोषींवर कठोर कारवाई करा अशी  मागणी केली आहे.  तसंच शिवरायांचे दोन मावळे एकामेका विरूद्ध लढतात हे चित्र काही फार आश्वासक नाही असंही त्यांनी सांगितलं. तसंच शांतता राखण्याचं आव्हान त्यांनी केलं आहे.

 कोरेगाव भीमा प्रकरणाची सीआयडी चौकशी करू- मुख्यमंत्री

 कोरेगाव भीमा प्रकरणाची सीआयडी चौकशी करू असं  आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. याप्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना लक्ष घालण्याची विनंती करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

याशिवाय कोरेगाव भीमा प्रकरणानंतर राज्यभरात शांतता राखावी असं सर्वपक्षीय नेत्यांनी आवाहन केलं आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 2, 2018 09:47 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

But the job is not done yet!
vote for the deserving condidate
this year

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close