रावसाहेब दानवे पुन्हा चुकले, विष्णू सावरांचं केलं निधन

रावसाहेब दानवे पुन्हा चुकले, विष्णू सावरांचं केलं निधन

पालघरमधील तलासरीमध्ये रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पण यावेळी बोलताना दानवे यांनी मोठी चूक केली.

  • Share this:

पालघर, 08 मे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे नेहमी या ना त्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असतात. आता तर त्यांनी विष्णू सावरा यांना ठार मारलंय.

पालघरमधील तलासरीमध्ये रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पण यावेळी बोलताना दानवे यांनी मोठी चूक केली. कार्यकर्त्याना संबोधित करताना रावसाहेब दानवे  भाषणाच्या सुरुवातीलाच चिंतामण वनगा ऐवजी विष्णू सावरा यांच्या निधनाचे व्यक्तव्य केलं. त्यांची चूक पदाधिकाऱ्यांनी लक्षात आणू दिली.

पण चुकणार नाही ते दानवे थोडी..भाषणाच्या शेवटला पुन्हा त्यांनी सावरांचा उल्लेख केला. भाषणाचा शेवट करताना ही सावरांचे कुटुंबीय तिकडे (शिवसेनेत) गेले तरी भाजपला फरक पडणार नाही असं म्हणून त्यांनी आणखी एक चूक केली. दानवेंच्या वक्तव्यांमुळे कार्यकर्तेही गोंधळून गेले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 8, 2018 05:54 PM IST

ताज्या बातम्या