रवींद्र गायकवाड दिल्लीत दाखल, अटकपूर्व जामिनासाठी हालचाली

रवींद्र गायकवाड दिल्लीत दाखल, अटकपूर्व जामिनासाठी हालचाली

शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड विमान आणि रेल्वे मार्गानंतर आता रस्ते मार्गाने दिल्लीत दाखल झाले आहेत.

  • Share this:

30 मार्च :  शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड विमान आणि रेल्वे मार्गानंतर आता रस्ते मार्गाने दिल्लीत दाखल झाले आहेत. गायकवाड यांनी आता अटकपूर्व जामीनासाठी तयारी सुरू केली आहे.

एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अटक होण्याची शक्यता लक्षात घेता, त्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार रवींद्र गायकवाड याप्रकरणी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 30, 2017 01:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...