रावेर लोकसभेची जागा भाजप व काँग्रेससाठी प्रतिष्ठेची..पण, बहुजन वंचित आघाडी वाढणार डोकेदुखी

भाजप व काँग्रेससाठी ही लढत चुरशीची असताना बहुजन वंचित आघाडीने नितीन कांडेलकर यांना मैदानात उतरविले आहे. कांडेलकर यांना उमेवारी दिल्याने भाजप व काँग्रेसच्या मतांचे (दलित व मुस्लिम) विभाजन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच भाजपसह काँगेसची डोकेदुखी वाढू शकते.

News18 Lokmat | Updated On: Apr 9, 2019 05:30 PM IST

रावेर लोकसभेची जागा भाजप व काँग्रेससाठी प्रतिष्ठेची..पण, बहुजन वंचित आघाडी वाढणार डोकेदुखी

रावेर, 9 एप्रिल- रावेर लोकसभेची जागा भाजप व काँग्रेससाठी प्रतिष्ठेची ठरली आहे . रावेर मतदार संघात भाजपकडून माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे तर काँग्रेसकडून डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचा रावेर लोकसभेच्या जागेचा तिढा विलंबाने सुटल्याने अखेर राष्ट्रवादीने ही जागा काँग्रेसला दिली. मागील दोन वेळा राष्ट्रवादीने आपले उमेदवार या जागेसाठी दिले होते. मात्र, दोन्ही वेळा राष्ट्रवादीला या ठिकाणी अपयश आले होते. त्यामुळे काँग्रेसचा या जागेसाठी आग्रह होता. अखेर माजी खासदार व काँग्रेस चे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांना काँग्रेसतर्फे उमेदवारी देण्यात आली.

भाजप व काँग्रेससाठी ही लढत चुरशीची असताना बहुजन वंचित आघाडीने नितीन कांडेलकर यांना मैदानात उतरविले आहे. कांडेलकर यांना उमेवारी दिल्याने भाजप व काँग्रेसच्या मतांचे (दलित व मुस्लिम) विभाजन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच भाजपसह काँगेसची डोकेदुखी वाढू शकते.

दरम्यान, रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या जळगाव जिल्ह्यामधील 5 व बुलढाणा जिल्ह्यामधील 1 असे एकूण 6 विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत. त्यामुळे दोन्हीही जिल्ह्यातील सर्व पक्षाचे कार्यकर्ते आपापला उमेदवार निवडून देण्याकरिता कामाला लागले आहेत.

एकनाथ खडसे- गिरीश महाजन मतभेद बहुचर्चित

एकनाथ खडसे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यातील मतभेद बहुचर्चित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय समचले जाणारे "संकटमोचन" अर्थात गिरीश महाजन यांच्या समर्थकाला रावेर लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा चांगली रंगली होती. अखेर रक्षा खडसे यांना पार्लमेंटरी बोर्डाकडून उमेदवारी जाहीर झाल्याने या चर्चेला विराम लागला होता.

Loading...

राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस चा रावेर लोकसभेच्या जागेचा तिढा विलंबाने सुटला. भाजप चा उमेदवार रक्षा खडसे यांनी अर्धा मतदार संघ पिंजून काढल्यावर आघाडीचा तिढा सुटला. 2014 मध्ये राष्ट्रवादीकडे असलेली ही जागा काँग्रेसला मिळवण्यात यश मिळाले. काँग्रेसचे माजी खासदार व काँग्रेसचे उपप्रदेशाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली.

रावेर लोकसभा मतदार संघात लेवा/धनगर/कोळी/ बहुजन (दलित )/ मुस्लिम व मराठा समाजाची टक्केवारी अधिक आहे . त्यामुळे ही निवडणूक जातीय समीकरणावर ठरली तर भाजप व काँग्रेसला याचा धक्का बसू शकतो. डॉ उल्हास पाटील व रक्षा खडसे लेवा समाजाचे असल्याने लेवा मतांचे विभाजन होणारच आहे त्यात बहुजन वंचित आघाडीने कोळी समाजाच्या नितीन कांडेलकर यांना उमेदवारी दिली तर राज्यात धनगर मराठा बहुजन मुस्लिम समाजाच्या उमेदवारांना उमेदवारी दिली असल्याने कोळी बहुजन मुस्लिम, धनगर मतांचे विभाजन होऊ शकते. त्यामुळे जातीय समीकरणावर ही लढत झाली तर ही चुरस अधिक तीव्र ठरेल.

भाजप-काँग्रेसमध्ये ही मुख्य लढत असताना बहुजन वंचित आघाडीनेही आपला उमेदवार रिंगणात उतरविल्याने ही लढत आता तिरंगी झाली आहे. भाजप व काँग्रेस लढतीत बहुजन वंचित आघाडीचा परिणाम होणार नसल्याचे बोलले जात असले तरी काँग्रेस व भाजपचा मतांचे विभाजन होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

रक्षा खडसे यांच्यासाठी एकनाथ खडसे हे आपली शक्ती पणाला लावून प्रयत्न करत आहेत. तसेच ग्रामीण भागापासून ते शहरांपर्यंत रक्षा खडसे यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यामुळे त्याचा फायदा रक्षा खडसे यांना होऊ शकतो. काँग्रेसचे उमेदवार उल्हास वासुदेव पाटील हे कॉंग्रेसचे केंद्रीय कार्यकारिणी समितीचे सदस्य आहेत. सन 1998 मध्ये जळगाव लोकसभा मतदार संघातून कॉंग्रेसतर्फे निवडून गेले होते. गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून रुग्णसेवेत अग्रेसर आहेत. याचा डॅा. पाटील यांना फायदा होऊ शकतो. त्यामुळे रक्षा खडसे यांच्यासमोर काँग्रेसने तगडे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे.

काय आहे 2014 मधील गणित?

2104 मध्ये भाजपच्या उमेदवारी रक्षा खडसे यांनी रावेर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार मनीष जैन यांना धूळ चारली होती. रक्षा खडसे या राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या स्नुषा आहेत. 2019 लोकसभा निवडणुकीत ह्या जागेसाठी भाजपकडून पुन्हा रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळाली आहे.


VIDEO: पराभवाच्या भीतीने महाआघाडीतले पक्ष एकत्र; मोदींचा महाआघाडीला टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 9, 2019 05:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...