रक्षकच झाले भक्षक,रत्नागिरीत 50 लाखांचं कोकेन जप्त

अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी दोघे रत्नागिरी कोस्टगार्डचे कर्मचारी आहेत त्यामुळे खळबळ उडालीय.

News18 Lokmat | Updated On: Jul 22, 2019 04:25 PM IST

रक्षकच झाले भक्षक,रत्नागिरीत 50 लाखांचं कोकेन जप्त

रत्नागिरी  22 जुलै : रत्नागिरी पोलिसांनी आज 50 लाखांचं कोकेन जप्त केलंय. विशेष म्हणजे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींपैकी दोन आरोपी हे रत्नागिरी कोस्ट गार्डचेच कर्मचारी आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या कर्मचाऱ्यांनी याआधीही असं कृत्य केलं होतं का याचा शोध आता पोलीस घेत असून संशयास्पद कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

रत्नागिरी एमआयडीसी परिसरात अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी दुसऱ्या राज्यातून एक टोळी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी एक पथक तयार केलं आणि या परिसरात सापळा रचला. यावेळी तीनजण एका पडक्या इमारतीमध्ये संशयास्पद वावरताना आढळले.

सोनभद्र हत्याकांड : 10 जणांच्या खूनाचा VIDEO पहिल्यांदाच आला समोर

त्यानंतर पोलिसांनी या तिघांचीही चौकशी करून त्यांना ताब्यात घेतलं. त्यांची झडती घेण्यात आली. यावेळी  तिघांकडे प्लास्टिक पिशवीमध्ये पांढरा रंग असलेलं पावडर आढळून आलं.  त्यानंतर मोबाईल फॉरेन्सिक सपोर्टींग युनिटकडून नार्कोटिक्स टेस्ट केली गेली. त्यावेळी हा पदार्थ कोकेन असल्याचं स्पष्ट झालं.

जप्त केलेलं कोकेन 936  ग्रँम असून बाजार भावाने त्याची किंमत 50 लाख एवढी आहे. याप्रकरणी हरयाणाचा दिनेश शुभे सिंह , राजस्थानचा सुनील कुमार नरेन्द्र कुमार रनवा आणि सोनपत हरयाणाचाच  रामचंद्र  मलीक  या तिघांना अटक करण्यात आलीय. या तिघांपैकी दिनेश आणि रामचंद्र हे दोघे रत्नागिरी  कोस्टगार्डचे कर्मचारी आहेत अशी माहिती रत्नागिरीचे पोलीस अधिक्षक प्रवीण मुंडे यांनी दिलीय.

Loading...

जन्मदात्यानेच पाजलं मुलाला विष

जन्मदात्या आईने स्वत:च्या मुलीची गळा चिरुन हत्या करून हल्ल्याचा बनाव केल्याची घटना ताजी असताना नाशिकमध्ये जन्मदात्या बापानेच आपल्या दोन मुलांना क्षुल्लक कारणावरून विष पाजल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. शाळेचे दप्तर मागितलं म्हणून जन्मदात्या बापाने आपल्या दोन मुलांना विष पाजले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात आरोपी बापा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही मुलांवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

चोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO

 बापाच ठरला वैरी...

नाशिक जिल्ह्यातील शिंदे पळसे या गावात ही संतापजनक घटना घडली आहे. ऋषिकेश बोराडे आणि निकिता बोराडे या दोन्ही मुलांवर उपचार सुरू आहेत. शाळेसाठी लागणारी वही, पुस्तक, दप्तर मागितल्याने नराधम बापाने आपल्या मुलांना विष पाजले. ऋषिकेश बोराडे याने दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी आरोपी पंढरीनाथ बोराडे या नराधम बापाला अटक केली आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश माइनकर यांनी सांगितले की, ऋषिकेश आणि निकिताला अत्यावस्त अवस्थेत नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती सिव्हिल सर्जन डॉ. सी.एस. जगदाळे यांनी दिली आहे. दरम्यान, शालेय साहित्य मागितल्याच्या किरकोळ कारणामुळे स्वत:च्या मुलांना विष पाजण्यात आल्याच्या घटनेने नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 22, 2019 04:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...