'लाईफलाईन एक्स्प्रेस' ठरतेय रत्नागिरीकरांचा हक्काचा 'डाॅक्टर'!

'लाईफलाईन एक्स्प्रेस' ठरतेय रत्नागिरीकरांचा हक्काचा 'डाॅक्टर'!

रत्नागिरीत दाखल झालेल्या लाईफलाईन एक्स्प्रेसमध्ये सध्या वेगवेगळ्या आजारांवरच्या मोफत तपासण्या आणि उपचार सुरू आहेत.

  • Share this:

दिनेश केळुसकर, रत्नागिरी

07 एप्रिल : रत्नागिरीच्या ग्रामीण भागातून स्तनांच्या आजाराचं निदान करून घेण्यास येणाऱ्या दर दहा महिलांमधल्या तीन महिलांना स्तनांचा कर्करोग असल्याच आढळून येतंय.

रत्नागिरीत दाखल झालेल्या लाईफलाईन एक्स्प्रेसमध्ये सध्या वेगवेगळ्या आजारांवरच्या मोफत तपासण्या आणि उपचार सुरू  आहेत. याचा फायदा घेण्यासाठी  रोज शेकडो रुग्ण सध्या या एक्स्प्रेसला भेट देतायत.

मोतिबिंदूच्या शस्त्रक्रीया दातांवरचे उपचार आणि अन्य सेवांसोबतच या एक्स्प्रेसमध्ये खास करून महिलांना होणाऱ्या स्तनांच्या कर्करोगाच निदान आणि उपचार मोफत केले जातायत. यात प्रामुख्याने ग्रामीण भागातून आलेल्या महिलांमध्ये स्तनांच्या कर्करोगाच प्रमाण खूप असल्याच इथल्या डॉक्टराना आढळून आलंय.

विशेष म्हणजे यातल्या अनेक महिलांना आपल्याला स्तनांचा कर्करोग झालाय किंवा होण्याची शक्यता असल्याच माहितीच नसून यासाठी सरकारी आरोग्य यंत्रणेकडून व्यापक स्तरावर जनजागृती होण आवश्यक असल्याचं या एक्सप्रेसमध्ये सेवा देणारे डॉक्टर म्हणतायत.

महागडे उपचार केवळ परवडत नाहीत म्हणून एखाद्याच्या आरोग्याची हेळसांड होऊ नये यासाठी इम्पॅक्ट इंडिया फाउंडेशन आणि भारतीय रेल्वे यानी 25 वर्षांपूवी हा उपक्रम सुरू केलाय. कोकणातला  या उपक्रमाचा हा 181 वा टप्पा आहे. हॉस्पिटल ऑन व्हील्स नावाने ओळखल्या जाणाऱ्या या रेल्वेत  दातांच्या आजारापासून ते अगदी कर्करोगापर्यंत चे निदान आणि उपचार मोफत पुरवले जातायत. 15 एप्रिलपर्यंत ही सेवा रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर उपलब्ध आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 7, 2017 07:46 PM IST

ताज्या बातम्या