दाभोळ शिवारात वणवा; शेकडो एकरातील पिके जळून खाक!

वणव्यामुळे बागेतील आंबा, काजूची कलमं यांचं मोठं नुकसान झालं असून, शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 30, 2018 08:44 PM IST

दाभोळ शिवारात वणवा; शेकडो एकरातील पिके जळून खाक!

रत्नागिरी, 30 ऑक्टोबर : रत्नागिरीच्या दाभोळ शिवारात पेटलेल्या वणव्यामुळं शेकडो एकरातील पिके जळून खाक झालीत. वणव्यामुळे बागेतील आंबा, काजूची कलमं यांचं मोठं नुकसान झालं असून, शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. दरम्यान, या वणव्याची झळ दाभोळ-भिवबंदर जवळील पेट्रोल पंपालाही लागली असती, पण नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे ही दुर्घटना टळली.

रत्नागिरीच्या दाभोळ शिवारात पेटलेल्या या वनव्यामुळे शेकडो एकर जमीन खाक झालीय. वणव्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं असून, शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी होत आहे. वणव्याची सर्वाधीक झळ या भागात असलेल्या बागांमधील आंबा आणि काजुच्या कलमांना मोठ्या प्रमाणात बसलीय. आगीच्या भक्षस्थानी पडल्यामुळे आंबा आणि काजुच्या कलमांचा अक्षरशः कोळसा झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

या वणव्याची झळ जर दाभोळ-भिवबंदर तिठ्यावरील पेट्रोल पंपाला बसली असती तर मोठा अनर्थ घडला असता. मात्र, नागरिकांच्या प्रगावधानतेमुळे हा पेट्रोल पंप थोडक्यात बचावला. कोकणात आता वणवे पेटायला सुरुवात झाली असून, दाभोळ शिवारात पेटलेल्या वणव्यामुळं अनेक प्राणी आणि जैव विविधता धोक्यात आली आहे. वणवे थांबविण्यासाठी शासन स्तरावर केल्या जाणाऱ्या ठोस उपाययोजना अपुऱ्या पडत असल्याचं समोर आलंय.

 VIDEO: नगरसेविकेचा स्टंट, आंदोलनासाठी चढली थेट हाय मास्ट दिव्याच्या खांबावर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 30, 2018 08:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...