'देव तारी...', तान्हुली रेल्वेच्या शौचालयात जन्मली, ट्रॅकवर पडली पण तरीही सुखरूप बचावली

रेल्वेच्या टॉयलेटच्या ड्रेनपाईपमधून रुळांवर पडल्यानंतरही ती तान्हुली बचावलीये.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 26, 2017 04:49 PM IST

'देव तारी...', तान्हुली रेल्वेच्या शौचालयात जन्मली, ट्रॅकवर पडली पण तरीही सुखरूप बचावली

26 एप्रिल : आईच्या कुशीत विसावलेली ही आहे कोकणकन्या..जन्मानंतर अवघ्या काही क्षणात या चिमुरडीला कोकणकन्या नाव मिळालंय. कारण या चिमुरडीनं यमराजालाही हुलकावणी दिलीये. रेल्वेच्या टॉयलेटच्या ड्रेनपाईपमधून रुळांवर पडल्यानंतरही ती तान्हुली बचावलीये.

कोकणकन्येची आई चंदना शाह या रत्नागिरीहून मुंबईकडे येणाऱ्या एक्स्प्रेसमधून प्रवास करत होत्या. गाडी कासू स्टेशनजवळ आली असतानाच नऊ महिन्यांच्या गरोदर असलेल्या चंदना शाह यांना प्रसुतीकळा येऊ लागल्या. सुरुवातीला पोटात दुखत असेल म्हणून त्या शौचालयात गेल्या. पण त्या प्रसुतीकळा असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर काही वेळातच त्यांची प्रसुती झाली. धक्कादायक बाब म्हणजे जन्मलेलं बाळ शौचालयाच्या ड्रेनपाईपमधून खाली पडलं.

कोकणकन्या रेल्वेरुळांवर पडल्याचं लक्षात येताच चंदना शहा यांनी एकच आरडाओरडा केला. एक्स्प्रेस थांबवली गेली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी ट्रॅकवर जाऊन पाहिलं असता बाळ व्यवस्थित होतं. ड्रेनपाईपमधून ट्रॅकवर पडूनही तिला कोणतीही इजा झाली नव्हती.

रेल्वे कर्मचाऱ्यांनी 'कोकणकन्या' आणि तिची आई चंदना या दोघांनाही कासूच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. दोघांचीही प्रकृती उत्तम असल्यानं 'कोकणकन्या' तिच्या आईसह पुढच्या प्रवासाला रवाना झाले. रेल्वेतून रोज लाखो प्रवासी प्रवास करतात. पण कोकणकन्येच्या जन्मानं आणि तिला मिळालेल्या जिवदानामुळे  चंदना शहा आणि कासू स्टेशनच्या रेल्वे कर्मचाऱ्यांचा आजचा दिवस स्पेशल ठरला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 26, 2017 04:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...