राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन तरुणीची आत्महत्या

राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन तरुणीची आत्महत्या

एका 21 वर्षीय तरुणीनं राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

रत्नागिरी, 31 मार्च : एका 21 वर्षीय तरुणीनं राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रत्नागिरीतील दापोली येथील ही घटना आहे. तेजश्री जाधव असं आत्महत्या करणाऱ्या तरुणीचं नाव आहे. तेजश्रीनं प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, तिच्या आत्महत्येमागे आणखी काही कारण आहे का? या दिशेनंही पोलीस तपास करत आहे.

दापोली शहरातील पोस्ट ऑफिस गल्लीतील राहत्या घरी तेजश्रीनं पंख्याला गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं. रविवारी (31 मार्च) संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास तिनं आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. घरात कोणीही नसल्याचं पाहून तेजश्रीनं आपली जीवनयात्रा संपवल्याचं म्हटलं जात आहे. तेजश्री अतिशय मनमिळावू आणि गुणी मुलगी असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. तिच्या मृत्युने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

वाचा अन्य बातम्या

VIDEO देवदर्शनाला जाऊ नका, देव मीच आहे; भाजपच्या उमेदवाराचा अजब दावा

लग्नाच्या चर्चेत मलायका अरोराचे मालदिवचे फोटो व्हायरल, लोकांनी केल्या अश्लिल कमेंट

'इनकमिंग' सुरुच, काँग्रेसच्या माजी आमदाराच्या मुलाचा भाजपमध्ये प्रवेश

मलायका - अर्जुनच्या नात्यावर काय म्हणाला अरबाज?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2019 08:52 PM IST

ताज्या बातम्या