News18 Lokmat

चिंचणीत एसटी बससेवेसाठी रास्तारोको आंदोलन

तासगाव तालुक्यातील चिंचणी येथे शिक्षणासाठी परगावी जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांसाठी एस.टी. बससेवा सुरु करावी. या मागणीसाठी आज चिंचणी येथील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Sep 11, 2017 10:25 AM IST

चिंचणीत एसटी बससेवेसाठी रास्तारोको आंदोलन

तासगाव, 11 सप्टेंबर: खासदार संजयकाका पाटील यांच्या गावात रास्ता रोको. तासगाव तालुक्यातील चिंचणी येथे शिक्षणासाठी परगावी जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांसाठी एस.टी. बससेवा सुरु करावी. या मागणीसाठी आज चिंचणी येथील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं.

वारंवार निवेदन देऊनही बस सेवा सुरु न झाल्यामुळे चिंचणीकरांनी हे आंदोलन केलं आहे. तसंच या गावचेच असणारे सांगली जिल्ह्याचे खासदार संजयकाका पाटील (भाजप) यांनाही वारंवार निवेदन व मागणी करण्यात आली होती. पण  त्यांनीही गावकऱ्यांना फक्त  केवळ आश्वासनं दिली असं ग्रामस्थांनी सांगितलं. त्यामुळे आक्रामक झालेल्या विद्यार्थी व ग्रामस्थांनी अचानकपणे रास्तारोको केलं आहे.

या रास्तारोरकोमुळे सकाळच्या वेळी नोकरीवर व शाळेला जाणाऱ्याची गैरसोय झाली आहे. तासगांवकडे येणारी सर्व वाहतूक चिंचणी इथे ठप्प झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 11, 2017 10:25 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...