#WomensDay : 'या' दोघींना 'राष्ट्रीय नारीशक्ती पुरस्कार' जाहीर!

#WomensDay : 'या' दोघींना 'राष्ट्रीय नारीशक्ती पुरस्कार' जाहीर!

आजचा दिवस प्रत्येक नात्याला खुलवणाऱ्या महिलांचा आहे. त्यांच्या कर्तुत्वाला सलाम करण्याचा आहे. असाच सलाम केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयकड़ून दिला जाणारा आहे.

  • Share this:

08 मार्च : आजचा दिवस प्रत्येक नात्याला खुलवणाऱ्या महिलांचा आहे. त्यांच्या कर्तुत्वाला सलाम करण्याचा आहे. असाच सलाम केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयकड़ून दिला जाणारा आहे. महिलांच्या कर्तुत्वाला पाहुण त्यानं 'राष्ट्रीय नारीशक्ती पुरस्कार' प्रदान करण्यात येणार आहे. यात यंदा महाराष्ट्रातील सिंधुताई सपकाळ आणि उर्मिला आपटे यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

आज जागतिक महिला दिनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अनाथ मुलांना हक्कचे घर आणि माया मिळावी यासाठी सिंधुताई यांनी आयुष्यभर संघर्ष केला आहे. त्या अनेक अनाथांच्या आई झाल्या. त्यांनी त्यांच्या भाषणांमधून प्रत्येकाच्या पोटाची खळगी भरली. त्यांचं हे काम म्हणजे मातृत्वाचं जिवंत उदाहरण आहे. त्यांसाठी त्यांना 'राष्ट्रीय नारीशक्ती पुरस्कार' देण्यात येणार आहे.

तर दुसरीकडे, भारतीय स्त्री शक्ती या स्वयंसेवी संस्थेची स्थापना करून उर्मिला आपटे सुमारे 30 वर्षापासून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य, शिक्षण, प्रशिक्षण, आर्थिक स्वातंत्र यावर काम करतायत. महिलांची होणारी मानव तस्करी ही देशात मोठी समस्या आहे. महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलनं हाच सर्व महिलांच्या प्रश्नवरच उत्तर आहे अशी प्रतिक्रिया उर्मिला आपटे यांनी न्यूज18 लोकमतशी बोलताना दिली आहे.

या दोघींच्या विचारशक्तीला आणि त्यांच्या धैर्याला न्यूज18 लोकमतचा सलाम!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 8, 2018 08:30 AM IST

ताज्या बातम्या