अखेर रशीदभाईंची मृत्यूशी झुंज संपली..पेट्रोल अंगावर टाकून दिले होते पेटवून

जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी येथे मागील आठ दिवसांपूर्वी दोन युवकांनी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून येथील दुकानदार रशीदभाई तांबोळी यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. यात ते गंभीर जखमी झाले होते.

News18 Lokmat | Updated On: May 25, 2019 05:39 PM IST

अखेर रशीदभाईंची मृत्यूशी झुंज संपली..पेट्रोल अंगावर टाकून दिले होते पेटवून

रायचंद शिंदे,( प्रतिनिधी)

जुन्नर- तालुक्यातील मांजरवाडी येथे मागील आठ दिवसांपूर्वी दोन युवकांनी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून येथील दुकानदार रशीदभाई तांबोळी यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर मंचर ग्रामीण व खासगी रुग्णालय उपचार करून, पुण्यात खासगी रुग्णालयात उपचार सुरु होत. परंतु जखमा खोलवर असल्याने ते उपचारास प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर शनिवारी दुपारी 1.45 वाजता त्यांचे निधन झाले.

ही घटना 14 मेच्या पहाटे घडली होती. दोन तरुणांनी जुना राग मनात धरून दुकानातून सिगारेट व माचिस खरेदी करण्याचा बहाणा करून रशीदभाई तांबोळी यांना घराबाहेर बोलावले होते. त्यांचे हात व पाय बांधून तोंडात बोळा कोंबून त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये रशीदभाई 60 टक्के भाजले होते.

रशीदभाई यांचं किराणामालाचं दुकान असून पूर्वी ते मांजरवाडी ग्रामपंचायतीचे कर्मचारी म्हणूनही काम पाहत होते. काही दिवसांपूर्वी रस्त्याचे काम सुरु होते. रस्ता कच्चा असतानाही शेजारी राहणारे ऋषिकेश लोखंडे आणि किरण जाधव यांनी त्यावरुन दुचाकी नेली. तेव्हा रशीदभाई आणि त्यांच्यात वाद झाला. नंतर तो सामंजस्याने मिटला होता. पण हृषिकेश आणि किरणच्या डोक्यात सुडाची भावना कायम होती. त्यातून हा प्रकार घडला होता.

सदर घटनेची माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनला रशीदभाई यांचा मुलगा शोएब तांबोळी यांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी करून ऋषिकेश पोपट लोखंडे व किरण कानिफनाथ जाधव या दोन तरुणांवर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले होते. नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील पुढील तपास करत आहेत.सदर घटना गावात गावठाण हद्दीतच घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. पण रशीदभाई यांच्या निधनाची बातमी आज दुपारी जेव्हा पंचक्रोशीत समजली तेव्हा अनेकांनी हळहळ व्यक्त केली. मांजरवाडी आणि खोडद ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून आदरांजली वाहिली.

Loading...


पराभवानंतर अशोक चव्हाण राजीनामा देण्याच्या तयारीत, पाहा UNCUT पत्रकार परिषद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 25, 2019 05:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...