अत्यंत घृणास्पद! उपचारासाठी आलेल्या दीरानेच केला वहिनीवर बलात्कार

पीडीतेचा पती कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. पीडीता घरी एकटीच होती. ती स्वयंपाक करत असताना बाम लावण्याच्या बहाण्याने बोलावले. नराधमाने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. परंतु...

News18 Lokmat | Updated On: Apr 17, 2019 06:29 PM IST

अत्यंत घृणास्पद! उपचारासाठी आलेल्या दीरानेच केला वहिनीवर बलात्कार

नागपूर, 17 एप्रिल- राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात अत्यंत घृणास्पद घटना घडली आहे. उपचारासाठी आलेल्या दीराने आजारपणात मदत करणाऱ्या वहिनीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 30 वर्षीय पीडीतेच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी गुजरातला पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

शरीरसुखाची केली होती मागणी..

पीडीत महिला मुळची राजस्थानातील बाडमेर येथील राहणारी आहे. पतीसोबत ती दाभा परिसरात भाड्याने राहते. तिचा पती फर्निचर बनविण्याची कामे करतो. आरोपी हा गुजरातमध्ये सुरत येथे राहतो. पीडीतेच्या पतीचा चुलत भाऊ आहे. तो मुतखड्याच्या उपचारासाठी नागपुरात आला होता.

पीडीतेचा पती कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. पीडीता घरी एकटीच होती. ती स्वयंपाक करत असताना बाम लावण्याच्या बहाण्याने बोलावले. नराधमाने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. परंतु तिने नकार दिला. दीराने जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला. पती घरी परतल्यानंतर पीडीतेने त्याला आपबिती सांगितली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Loading...

VIDEO: जेव्हा 20 सिंहांचा कळप गावच्या दिशेनं येतो...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 17, 2019 06:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...