S M L

ऊसतोड कामगाराच्या 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार, दगडाने ठेचून मारण्याचा केला प्रयत्न

वांगी गावाच्या शिवारात आज सकाळी 11.30 च्या सुमारास ही संतापजनक घटना घडली आहे.

Updated On: Jan 8, 2019 12:04 AM IST

ऊसतोड कामगाराच्या 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार, दगडाने ठेचून मारण्याचा केला प्रयत्न

सागर सुरवसे, प्रतिनिधी

सोलापूर, 07 जानेवारी : करमाळा तालुक्यातील वांगी गावात ऊसतोडणीसाठी आलेल्या कामगाराच्या 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म करून दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलीला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

वांगी गावाच्या शिवारात आज सकाळी 11.30 च्या सुमारास ही संतापजनक घटना घडली आहे. आई-वडील शेतात ऊस तोडायला गेले, असताना बाथरुमसाठी बाहेर पडलेल्या या 14 वर्षीय मुलीवर दुष्कर्म करण्यात आले होते. आपली वाच्यात कुठे होऊ नये, म्हणून या नराधमांनी मुलीला दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न केला होता. जखमी अवस्थेत या मुलीला उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.============================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 7, 2019 07:04 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close