लग्नाचे आमिष दाखवून औरंगाबादेतील विवाहितेवर वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार

औरंगाबाद येथून विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून पळवून आणून तिच्यावर नगर, पुणे जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 25, 2019 07:48 PM IST

लग्नाचे आमिष दाखवून औरंगाबादेतील विवाहितेवर वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार

नगर, 25 जुलै-औरंगाबाद येथून विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून पळवून आणून तिच्यावर नगर, पुणे जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपी योगेश सिद्धेश्वर शिंदे (रा.घारगाव, ता.श्रीगोंदा) असे नराधमाचे नाव असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपीने औरंगाबाद येथून पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून नगर येथे पळवून आणले. पीडिता विवाहित आहे. आरोपीने 2017 ते 20 जुलै 2019 या दोन वर्षांत पीडितेसोबत नगरसह पुणे जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी शरीर संबंध प्रस्तापित केले. विशेष म्हणजे आरोपीने पीडितेला नगर एमआयडीसीमध्ये भाड्याची खोली घेऊन दिली होती. या खोलीतही आरोपीने पीडितेवर अनेकही अत्याचार केला. एवढेच नाही तर रांजनगाव, कारेगाव, शिरुर येथील वेगवेगळ्या लॉजवर तिच्यावर अत्याचार करण्यात आला. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी योगेश शिंदे यांचाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वंचित आघाडीच्या जिल्हाध्यक्षाने नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची केली फसवणूक..

दुसऱ्या एका घटनेत वंचित आघाडीच्या जिल्हाध्यक्षाने नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची फसवणूक केली आहे. ही घटना सोलापूरमध्ये घडली आहे. धम्मपाल माशाळकर असे आरोपीचे नाव आहे. सोलापूर विद्यापीठात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आरोपीने तरुणाची 2 लाख 65 हजार रुपयांची फसवणूक केली. मुलाखतीसाठी विद्यापीठाच्या नावे तरुणाला बनावट मुलाखत पत्रही देण्यात आले होते. या प्रकरणी जोडभावी पेठ पोलीस स्टेशनमध्ये धम्मपाल माशाळकर याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

VIDEO:लेफ्टनंट कर्नल धोनी लष्करात निभावणार ही जबाबदारी, संध्याकाळच्या 18 सुपरफास्ट बातम्या

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 25, 2019 07:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...