एवढी तूर खरेदी केली, तरी रडतात XXX, दानवेंची जीभ घसरली

एवढी तूर खरेदी केली, तरी रडतात XXX, दानवेंची जीभ घसरली

"रडे धंदे करू नका, गव्हाला भाव नाही मिळाला, तुरीला भाव नाही मिळाला...कालच एक लाख टन तूर खरेदीला परवानगी दिली तरीही रडता XXX.."

  • Share this:

10 मे : नेहमी या ना त्या विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आता शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलंय. एवढी तूर खरेदी केली तरी रडता XXX अशी असंसदीय भाषाच दानवेंनी वापरली.

जालन्यामध्ये भाजपचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी एका कार्यकर्त्याने तूर खरेदी न झाल्याबद्दल दानवेंना प्रश्न विचारला. कार्यकर्त्याने प्रश्न विचारल्यानंतर दानवे चांगलेच खवळले.  मागील सरकारने तूर खरेदी केली नाही. पण भाजप सरकारने सगळ्यांच्या तूर खरेदी केली. आणि पहिल्यांदाच स्वातंत्र्यानंतर तुरीच्या खरेदीत 400 रुपये जास्त दिले. त्यामुळे रडे धंदे करू नका, गव्हाला भाव नाही मिळाला, तुरीला भाव नाही मिळाला...कालच एक लाख टन तूर खरेदीला परवानगी दिली तरीही रडता XXX...असं असंवेदनशील वक्तव्य दानवे यांनी केलं.

विशेष म्हणजे दानवेंची ही काय पहिलीच वेळ नाही. याआधीही दानवे यांनी आचारसंहितेचा भंग करत लक्ष्मी स्वीकारण्याचा सल्लाच भरसभेत दिला होता. आणि आता तर शेतकऱ्यांनाच नको ते बोलून बसले आहे.

काय म्हणाले दानवे ?

"ज्या मालाचे हमीभावाचे सरकारने दर ठरवले आहे. त्या मालाला हमी भावापेक्षा कमी दरात भाव मिळत असेल तर सरकार मार्केटमध्ये उतरतं आणि बाजारामध्ये स्थिरता राहावी म्हणून 25 टक्के माल खरेदी करतं. आतापर्यंतच्या इतिहास मागच्या सरकारने असंच केलं. पण भाजप सरकारने सगळ्यांच्या तूर खरेदी केली. आणि पहिल्यांदाच स्वातंत्र्यानंतर तुरीच्या खरेदीत 400 रुपये जास्त दिले. त्यामुळे रडे धंदे करू नका, गव्हाला भाव नाही मिळाला, तुरीला भाव नाही मिळाला. बिल्कुल डोक्यातून हे काढून टाका. उगाच जिल्हापरिषदेला 22 जागा आल्या नाही.  आपल्या कार्यकर्त्यांनी आता लढायचं रडायचं नाही. आता तुरीचा खुना काढायचा नाही...ते आम्ही पाहू...परवाच 1 लाख टनाला खरेदी दिली...तरी रडता XXX .... तू जास्त पेपर वाचतो का ? वाचू नको..."

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 10, 2017 08:09 PM IST

ताज्या बातम्या