भाजपचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण? रावसाहेब दानवे म्हणतात...

भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असलेल्या रावसाहेब दानवे यांचा केंद्रातील मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 1, 2019 01:37 PM IST

भाजपचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण? रावसाहेब दानवे म्हणतात...

शिर्डी, 1 जून : 'राज्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्यामध्ये असलेल्या क्षमतेचा पूर्ण वापर करून राज्याला अधिक फायदा मिळवून देणार,' असं म्हणत नवनियुक्त केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आपला अजेंडा स्पष्ट केला आहे.

भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असलेल्या रावसाहेब दानवे यांचा केंद्रातील मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे. या पदासाठी भाजपमधून अनेक नेत्यांची नावं चर्चेत आली आहेत.

भाजपचा प्रदेशाध्यक्ष कोण होणार, याबाबत रावसाबे दानवे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर दानवे यांनी हे नाव जाहीर करण्यास नकार दिला. 'कशाला माझ्या तोंडून नाव काढून देता,' अशी मिश्किल प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर आता नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत इतरही काही खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये महाराष्ट्रातून रावसाहेब दानवे यांच्या नावाचाही समावेश आहे. दानवे दिल्लीत जाणार असल्याने भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासाठी आता शिक्षणमंत्री विनोद तावडे, भाजपचे सरचिटणीस संजय कुटे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. या निवडणुकीत चांगली कामगिरी करण्यासाठी भाजपकडून त्या तोडीच्या नेत्याला प्रदेशाध्यक्षपदी बसवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यामुळे या पदासाठी भाजप कुणाला संधी देतं, हे आता पाहावं लागेल.

Loading...


VIDEO: कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी धनंजय मुंडेंनी म्हटली 'कविता'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 1, 2019 01:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...