Elec-widget

कर्जमाफी केल्यास शेतकरी आत्महत्या करणार नाही असं लिहून द्या, दानवेंची अजब मागणी

कर्जमाफी केल्यास शेतकरी आत्महत्या करणार नाही असं लिहून द्या, दानवेंची अजब मागणी

"कर्जमाफ करून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत असतील तर विरोधकांनी एकत्र यावं आणी शेतकरी आत्महत्या करणार नाही यासाठी प्रस्ताव द्यावा"

  • Share this:

08 मे : कर्जमाफी केल्यास शेतकरी आत्महत्या करणार नाहीत असं लिहून द्या अशी अजब मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी विरोधकांकडे केलीये. ते शिर्डीत बोलत होते.

शेतकरी कर्जमाफीवर विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरलं. मात्र, आता रावसाहेब दानवेंनी अजब मागणी करून वाद ओढावून घेतलाय.   कर्जमाफ करून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत असतील तर विरोधकांनी एकत्र यावं आणी शेतकरी आत्महत्या करणार नाही यासाठी प्रस्ताव द्यावा अशी मागणी रावसाहेब दानवेंनी केली.

तसंच आमच्यावर काय आरोप होताहेत याची चिंता नाही. आम्ही  पायाभूत सुविधा देण्याकडे आमचा भर आहे असंही रावसाहेब दानवे ठणकावून सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 8, 2017 04:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...