रावसाहेब दानवेंची मंत्रिपदी वर्णी, कोणतं खातं मिळणार?

रावसाहेब दानवे मोदींच्या पहिल्या टर्ममध्ये सुरुवातीच्या काळात मंत्री होते. पण त्यानंतर दानवे यांच्याकडे महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्षपद सोपवण्यात आलं.

News18 Lokmat | Updated On: May 30, 2019 03:42 PM IST

रावसाहेब दानवेंची मंत्रिपदी वर्णी, कोणतं खातं मिळणार?

नवी दिल्ली, 30 मे : भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. रावसाहेब दानवे मोदींच्या पहिल्या टर्ममध्ये सुरुवातीच्या काळात मंत्री होते. पण त्यानंतर दानवे यांच्याकडे महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्षपद सोपवण्यात आलं.

रावसाहेब दानवे हे गेल्या अनेक वर्षांपासून जालना मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकत आले आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुभवाला प्राधान्य देत भाजपने त्यांना मंत्रिपदाची संधी दिली आहे.

दरम्यान, रावसाहेब दानवे यांची मंत्रिपदी वर्णी लागली असल्याने महाराष्ट्र भाजपचं प्रदेशाध्यक्षपद कुणाकडे जाणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. दानवे दिल्लीत जाणार असल्याने भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासाठी आता शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि भाजपचे सरचिटणीस संजय कुटे यांच्या नावाची चर्चा आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. या निवडणुकीत चांगली कामगिरी करण्यासाठी भाजपकडून त्या तोडीच्या नेत्याला प्रदेशाध्यक्षपदी बसवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यामुळे या पदासाठी भाजप कुणाला संधी देतं, हे आता पाहावं लागेल.

पंतप्रधान कार्यालयाने मंत्रिपदासाठी फोन केलेल्या नेत्यांमध्ये अनेक जुन्या मंत्र्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे, तर काही नवे चेहरेही पाहायला मिळत आहेत.

Loading...

भाजपकडून कुणाला-कुणाला मिळणार संधी?

दानंद गौडा, अर्जुन राम मेघवाल, प्रकाश जावडेकर, रामदास आठवले , सुरेश अंगाडी, पीयूष गोयल, बाबूल सुप्रियो, जितेंद्र सिंह, किशन रेड्डी, सुरेश अंगदी, स्मृती इराणी, प्रहलाद जोशी, राजनाथ सिंह, निर्मला सीतारमण, रविशंकर प्रसाद, मुख्तार अब्बास नकवी यांना पंतप्रधान कार्यालयामधून फोन आल्याची माहिती आहे.


VIDEO: पायल तडवी आत्महत्या प्रकरणाचा तपास आता मुंबई क्राईम ब्रांचकडे


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 30, 2019 03:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...