S M L

तासाभरात बदलले महाराष्ट्राचे राजकारण, आदित्यनंतर दानवेंनी केला युतीबद्दल मोठा खुलासा

भाजप नेते युतीवर ठाम आहे. जालन्यात पत्रकारांशी बोलताना, रावसाहेब दानवे यांनी युती होणारच असं सांगितलं आहे.

Updated On: Jan 10, 2019 09:52 PM IST

तासाभरात बदलले महाराष्ट्राचे राजकारण, आदित्यनंतर दानवेंनी केला युतीबद्दल मोठा खुलासा

जालना, 10 जानेवारी : 'युतीचा फाॅर्म्युला ठरला आहे, केवळ बसायचं आणि युतीची घोषणा करायची एवढंच बाकी आहे. त्यामुळे केंद्र तयार असणे आणि नसणे, यामध्ये फार काही विशेष नाही', असा मोठा खुलासा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे. शिवसेनेच्या युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर दानवे यांनी युतीबद्दल खुलासा केल्यामुळे तासाभरात राज्यातील राजकारणाला नवं वळण मिळालं आहे.

भाजपचे अध्यक्ष अमित शहांच्या लातूर येथील मेळाव्यात युतीबद्दल केलेल्या विधानानंतर भाजप आणि शिवसेनेत कमालीचे संबंध ताणले गेले आहे. उद्धव ठाकरे यांनी तर 'युतीचा विषय खड्यात गेला', असं सांगितलं होतं. परंतु, दुसरीकडे भाजप नेते युतीवर ठाम आहे.

जालन्यात पत्रकारांशी बोलताना रावसाहेब दानवे यांनी युती होणारच असं सांगितलं आहे. "युतीचा फॉर्म्युला हा ठरलेला असून केवळ बसायचं आणि युतीची घोषणा करायची आहे', असा दावाच त्यांनी केला आहे. तसंच,'युतीसाठी आम्ही शेवटपर्यंत आमच्याकडून प्रयत्न करणार फक्त निर्णय शिवसेनेला घ्यायचा',हे सांगायलाही ते विसरले नाही.

उद्धव ठाकरेंना इशारा

उद्धव ठाकरे काल बुधवारी बीडच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी झालेल्या सभेत, 'रावसाहेब दानवे यांना आता रडवण्याची वेळ आली आहे',अशी टीका त्यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.  'शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ज्या तऱ्हेची वैयक्तिक टीका करतात त्यावरून त्यांची पातळी समजते. ते सगळ्यांवर टीका करतात, पंतप्रधान मोदी, अमित शहा, मुख्यमंत्री तसंच माझ्यावरही टीका करतात हे योग्य नाही. शब्द माझ्याकडेही आहे, मलाही बोलता येतं', असा इशाराच  दानवेंनी दिला. तसंच 'घोडा मैदान सामने है', सगळ्यांना चारही मुंड्या चित करणार, हे मी प्रत्येक निवणुकीत केलं आहे आणि यावेळेलाही करेल,' असा दावाही त्यांनी केला.

Loading...

आदित्य ठाकरेंचं सुचक वक्तव्य

शिवसेनेच्या युवासेनेचे अध्य़क्ष आदित्य ठाकरे यांनी  युतीची चर्चा जोरात सुरू आहे, दहीहंडीत अनेक थर असतात. त्यामुळे युतीच्या चर्चेत आम्ही नेमक्या कोणत्या थरावर हे उद्या दिल्लीत ठरेल', असं सुचक वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी नाशिक येथील एका कार्यक्रमामध्ये केलं आहे.

जयंत पाटलांना प्रत्युत्तर

"मुख्यमंत्र्यांना या राज्यातला कुणीही भेटू शकतो, उद्धव ठाकरेच काय जयंत पाटीलही भेटतात म्हणून मुख्यमंत्री हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, ते कोणत्या पक्षाचे नाहीत', असं सांगत दानवे यांनी जयंत पाटलांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.

जयंत पाटील यांनी जनसंघर्ष यात्रे 'उद्धव ठाकरे यांनी दुपारी मोदींविरोधात भाषण केले आणि रात्री सोफिटेल हॉटेलमध्ये मुख्यमंत्र्यांसमोर नाक घासत गेले,' अशा शब्दांत टीका केली होती.

===================


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 10, 2019 09:51 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close