S M L

रावसाहेब दानवेंनी व्यक्त केली दिलगिरी

Samruddha Bhambure | Updated On: May 11, 2017 04:27 PM IST

रावसाहेब दानवेंनी व्यक्त केली दिलगिरी

11 मे : माझ्या आणि कार्यकर्त्यांच्या संवादाला शेतकऱ्यांशी जोडू नये. परंतु यावरही शेतकऱ्यांची मनं दुखावली गेली असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी खेद व्यक्त केला आहे. मी शेतकऱ्यांना उद्देशून कोणताही अपशब्द वापरला नाही. मी स्वतः शेतकऱ्यांच्या पोटी जन्म घेतला आहे. शेतकऱ्यांचे दु:ख मला माहिती आहे. शेतकऱ्यांची बाजू घेत सतत 35 वर्ष मी राजकारणात आहे. त्यामुळे मी शेतकऱ्यांबद्दल कधीही अपशब्द वापरू शकत नाही, अशी सारवासारव त्यांनी केली आहे.

शेतकरी नेहमी दर नाही, दर नाही म्हणून रडगाणी गात असतात. आता हे बंद करा, असे वादग्रस्त विधान दानवे यांनी केलं होतं. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावरुन त्यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर अखेर आज त्यांनी आपल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली.

दानवेंच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील शेतकरी संतप्त झाला आहे. शिर्डी, सांगोला, डोंबिवली, धुळे, नाशिक आणि वाशिममध्ये शिवसेनेनं रावसाहेब दानवेंच्या या वक्तव्याचा निषेध करत जोरदार आंदोलन केलं. शिर्डी आणि सांगोला इथं शिवसैनिकांनी रावसाहेब दानवेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडेमारा आंदोलन करत त्यांच्या पुतळ्याचं दहन केलं. तर डोंबिवलीमधेही शिवसैनिकांनी चपला मारा आंदोलन केलं. रावसाहेब दानवेंची भाजपने हकालपट्टी करण्याची मागणी करत, राज्यात रावसाहेब दानवेंना फिरू देणार नाही, असा इशाराही शिवसैनिकांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 11, 2017 04:26 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close