News18 Lokmat

पुण्यात गणपती वर्गणीच्या नावावर खंडणी, व्यापाऱ्यांची पोलिसांकडे धाव

गणेशोत्सवाच्या महिनाभर आधीच शहरात आता व्यापाऱ्यांकडून गणेशमंडळाच्या कार्यकर्त्यांवर खंडणीची आरोप होत आहेत.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 29, 2017 09:34 PM IST

पुण्यात गणपती वर्गणीच्या नावावर खंडणी, व्यापाऱ्यांची पोलिसांकडे धाव

29 जुलै  : पुण्यातला गणेशोत्सव हा सगळ्यांच्याच आवडीचा उत्सव.. पण पुण्यातल्या सार्वजनिक गणेशोत्सवाने नाव धक्कादायक स्वरूप धारण केलंय. गणेशोत्सवाच्या महिनाभर आधीच शहरात आता व्यापाऱ्यांकडून गणेशमंडळाच्या कार्यकर्त्यांवर खंडणीची आरोप होत आहेत.

रविवार पेठेतील काही व्यापाऱ्यांनी अश्याच अनुभवामुळे थेट पोलीस आयुक्तांकडे धाव घेऊन आपली तक्रार सांगितल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी कारवाई सुरू केलीये. रविवार पेठेतील सत्याग्रही गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून मंडळाच ७५ वर्ष असल्यामुळे परिसरातल्या व्यापाऱ्यांकडून वर्गणीच्या नावाखाली खंडणी मागितल्याचा आरोप या व्यापाऱ्यांनी केलाय.

पूर्वी १०० दीडशे रुपये वर्गणी देणाऱ्या व्यापाऱ्यांकडून पाच हजार रुपये पावती आणि अकरा ते एकवीस हजार रुपये देणगीच्या नावाखाली या मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून मागण्यात आलेत. जे व्यापारी याला नकार देताहेत त्यांना शिवीगाळ करण्यात आल्याची तक्रार ही व्यापाऱ्यांनी केलीये. त्यामुळे गणेशोत्सवाच्या नावाखाली धुमाकूळ घालणाऱ्या खंडणी बहाद्दर कार्यकर्त्यांना आवरा अशी मागणी या व्यापाऱ्यांनी पोलिसांकडे केलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 29, 2017 09:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...