राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का; रणजितसिंह मोहिते-पाटील उद्या करणार भाजप प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का; रणजितसिंह मोहिते-पाटील उद्या करणार भाजप प्रवेश

काँग्रेसनंतर आता भाजप राष्ट्रवादीला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे.

  • Share this:

मुंबई, प्रफुल्ल साळुंखे, 19 मार्च : राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मुलानं भाजप प्रवेश केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसला देखील मोठा धक्का बसणार आहे. कारण, माढाचे खासदार विजयसिंह मोहिते - पाटील यांचा मुलगा रणजितसिंह मोहिते - पाटील हे देखील आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. उद्या अर्थात बुधवारी दुपारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील , गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. पण, विजयसिंह मोहिते - पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहणार आहेत. डॉ. सुजय विखे - पाटील यांच्या भाजप प्रवेशानं काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसला देखील मोठा धक्का बसणार आहे. डॉ. सुजय विखे यांच्या प्रवेशानंतर आणखी बरेच जण लाईनमध्ये असल्याचं विधान गिरीश महाजन यांनी केलं होतं.


राधाकृष्ण विखे - पाटील यांच्याबाबत जे घडलं त्यावर हायकमांड नाराज


रणजित सिंह माढाचे उमेदवार?

दरम्यान, रणजितसिंह मोहिते-पाटील हे भाजपकडून माढातील उमेदवार असणार आहेत. माढातून रणजितसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी देण्यासाठी राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी विरोध केला होता. त्यामुळे आता रणजित सिंह मोहिते- पाटील यांनी भाजप प्रवेश करण्याचा निर्णय घेतला की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

डॉ. सुजय विखे - पाटील यांना देखील नगरमधून उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न करेन असं मुख्यमंत्र्यांनी प्रवेशावेळी स्पष्ट केलं होतं.


रणजितसिंह मोहिते - पाटील का नकोत?

मोहिते-पाटील समर्थकांकडून पार्थ पवार,समीर भुजबळ चालतात मग रणजीतदादा का नाही ? असा सवाल विचारला जाऊ लागला आणि माढ्याचा तिढा अजूनच वाढला. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी गिरीश महाजन यांची यापूर्वीच भेट घेतली होती. तेव्हाच त्यांच्या भाजप प्रवेशावर चर्चा रंगली होती. पण, त्यांनी मात्र त्याला नकार दिला होता.


VIDEO: लज्जास्पद ! पुण्यात तरुणीचा विनयभंग, घटना सीसीटीव्हीत कैद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 19, 2019 11:35 AM IST

ताज्या बातम्या