S M L

नारायण राणे पक्ष काढून एनडीएत जाणार, भाजपकडून राणेंना राज्यात कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर

नारायण राणे दसऱ्याला स्वतःचा पक्ष स्थापन करणार असून, भाजप त्यांना लगेच कॅबिनेट मंत्रीही बनवणार आहे. भाजपच्या खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिलीय.

Chandrakant Funde | Updated On: Sep 27, 2017 02:16 PM IST

नारायण राणे पक्ष काढून एनडीएत जाणार, भाजपकडून राणेंना राज्यात कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर

प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी

मुंबई, 27 सप्टेंबर : नारायण राणे दसऱ्याला स्वतःचा पक्ष स्थापन करणार असून, भाजप त्यांना लगेच कॅबिनेट मंत्रीही बनवणार आहे. भाजपच्या खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिलीय. परवाच्या दिल्लीच्या अमित शहांसोबतच्या बैठकीत हा नवा फार्म्युला तयार झाला असून त्यात नारायण राणेंना भाजपात प्रवेश देण्याऐवजी त्यांना सदाभाऊ खोत यांच्यासारखा स्वतंत्र पक्ष काढण्यास सांगून एनडीएत सामील करून घेतलं जाणार आहे.

राणेंनी स्वतःचा पक्ष स्थापन केल्यानंतर त्यांना लगेच मित्रपक्ष म्हणून राज्यात कॅबिनेट मंत्री केलं जाईल. त्यानंतर राणेंच्याच रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेवर त्यांना निवडून आणलं जाईल. असा हा फार्म्युला ठरला आहे. भाजपच्या या नव्या फार्म्युल्याला संघ परिवारानेही हिरवा कंदिल दिल्याचं बोललं जातंय.नारायण राणेंना भाजपात घेण्यास होणारा पक्षांतर्गत विरोध आणि शिवसेनेची संभाव्य खळखळ लक्षात घेऊन भाजपच्याच धुरीणांनी हा मध्यममार्ग सुचवल्याचं बोललं जातंय. नारायण राणेंनीही त्याला तयारी दाखवल्याचं सूत्रांकडून कळतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 27, 2017 02:11 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close