Elec-widget

नारायण राणे काँग्रेसचा 'हात' सोडणार; नितेश राणे मात्र काँग्रेसमध्येच

नारायण राणे काँग्रेसचा 'हात' सोडणार; नितेश राणे  मात्र काँग्रेसमध्येच

राणे आज दुपारी साडेतीन वाजता यासंबधी कुडाळमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत.

  • Share this:

कुडाळ, 21 सप्टेंबर: नाराज काँग्रेस नेते नारायण राणे आज घटस्थापनेच्या मुहुर्तावर काँग्रेस आणि विधानपरिषदेची आमदारकी सोडणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. राणे आज दुपारी साडेतीन वाजता यासंबधी कुडाळमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत.

त्याआधी राणेंची बरखास्त करण्यात आलेल्या काँग्रेस जिल्हा कार्यकारिणीची बैठक होईल. या बैठकीत कार्यकारिणीचे काँग्रेस पदाधिकारीही आपल्या पदांचा आणि काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचं समजतं आहे . राणेंसोबत या पत्रकार परिषदेत त्यांचे ज्येष्ठ पुत्र माजी खासदार निलेश राणे हे ही हजर राहतील. मात्र नितेश राणे आज राणेंच्या या निर्णयाचा भाग असणार नाहीत .

काँग्रेस सोडण्याआधी भाजपकडून कोणतंही ठोस आश्वासन न मिळाल्यामुळेच कदाचित राणे कुटुंबियांना हा मध्यममार्ग स्वीकारावा लागत असल्याचं बोललं जातंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2017 09:20 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...