राणेंचं ठरलं; घटस्थापनेच्या दिवशीच काँग्रेससोबत 'घटस्फोट' !

नारायण राणे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीची दिशा येत्या 21 सप्टेंबरला कुडाळमध्येच जाहीर करणार आहेत. आजच्या कार्यकर्ता मेळाव्यात नारायण राणेंनी यासंबधीची घोषणा केली. तसंच जिल्ह्यातल्या निवडणुका राणे समर्थक यापुढे समर्थ विकास पॅनेलच्या बॅनरखालीच लढवतील, असंही नारायण राणेंनी यावेळी जाहीर केलं.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Sep 18, 2017 09:01 PM IST

राणेंचं ठरलं; घटस्थापनेच्या दिवशीच काँग्रेससोबत 'घटस्फोट' !

कुडाळ, 18 सप्टेंबर : नारायण राणे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीची दिशा येत्या 21 सप्टेंबरला कुडाळमध्येच जाहीर करणार आहेत. आजच्या कार्यकर्ता मेळाव्यात नारायण राणेंनी यासंबधीची घोषणा केली. तसंच जिल्ह्यातल्या निवडणुका राणे समर्थक यापुढे समर्थ विकास पॅनेलच्या बॅनरखालीच लढवतील, असंही नारायण राणेंनी यावेळी जाहीर केलं. प्रदेश काँग्रेसनं काल सिंधुदुर्गची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करताच नारायण राणेंनी आज कुडाळमध्ये आपल्या समर्थकांना मेळावा घेऊन शक्तीप्रदर्शन केलं. त्याला राणेंच्या दोन्ही पुत्रांसह बरखास्त कार्यकारिणीही उपस्थित होती.

अशोक चव्हाण आणि मोहन प्रकाश यांनीच षडयंत्र करून सिंधुदुर्गची काँग्रेस कमिटी बरखास्त केलीय. राज्यातली काँग्रेसही अशोक चव्हाणच संपवायला निघालेत. त्यांच्याविरोधात मी सोनिया गांधींकडे तक्रार केली होती. पण पक्षाने माझं म्हणणं न ऐकता चव्हाणांसारख्या लोकांनाच पाठिशी घातल्याचा आरोप राणेंनी केलाय. आज 31 जिल्ह्यातले कार्यकर्ते माझ्या निर्णयाची वाट पाहताहेत. त्यामुळे येत्या 21 तारखेलाच मोठी घोषणा करू असंही राणेंनी यावेळी जाहीर केलं.

दरम्यान, राणेंनी काँग्रेस सोडून भाजपात जाऊ नये, त्यांना तिकडे काहीच मिळणार नाही. असं आवाहन हुसेन दलवाई यांनी केलंय. तसंच राणेंच्याच मनात खोट असल्यानेच त्यांनी सिंधुदुर्गमधील काँग्रेसच्या झेडपी सदस्यांचा वेगळा गट स्थापन करून त्याची कोकण विभागीय कार्यालयात नोंदनी केल्याचा प्रत्यारोप दलवाई यांनी केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2017 07:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...