नारायण राणे आणि राष्ट्रवादी कोकणात आघाडी करण्याची शक्यता

नारायण राणे आणि सुनील तटकरे या दोघांना एकमेकांची मदत लागणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 21, 2018 12:25 PM IST

नारायण राणे आणि राष्ट्रवादी कोकणात आघाडी करण्याची शक्यता


दिनेश केळुसकर, प्रतिनिधी


21 नोव्हेंबर : कोकणातील जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना सोबत घेण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाची मदत घेऊन निवडणूक लढवण्याची चिन्ह आहे.


Loading...

मंगळवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बैठक पार पडली होती. याआधीही काही दिवसांपूर्वी एक बैठक झाली होती यात राष्ट्रवादीने सिंधुदुर्गची जागा सोडण्याची मागणी केली होती. सिंधुदुर्गमध्ये आमच्याकडे मोठा उमेदवार आहे असं राष्ट्रवादीने जाहीर केलं होतं. सिंधुदुर्गात मोठा उमेदवार कोण तर नारायण राणे यांचं नाव समोर आलं. सिंधुदुर्गात एक जागा आणि लोकसभा निवडणुकीसाठी रायगडची एक जागा सुनील तटकरेंसाठी सोडली आहे.


नारायण राणे आणि सुनील तटकरे या दोघांना एकमेकांची मदत लागणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षासोबत युती करू शकते. मात्र, काँग्रेसने याबद्दल अजून होकार कळवला नाही. नारायण राणे यांनी आघाडीसोबत युती केली तर राणे सोबत राहतील का ? असा प्रश्न काँग्रेसला पडलाय.


दरम्यान, नारायण राणे यांनी याबद्दल अजून कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी दिल्यानंतर भाजपच्या वाटेवर होते. पण, भाजपात प्रवेश होऊ शकला नाही. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाची स्थापन केली. त्यानंतर भाजपकडूनच नारायण राणे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली.


==================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 21, 2018 12:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...