रामटेक लोकसभा निवडणूक : शिवसेना आणि काँग्रेसचा सामना

रामटेकमध्ये शिवसेनेचे कृपाल तुमाने आणि काँग्रेसचे किशोर गजभिये यांच्यात सामना पाहायला मिळाला. रामटेकचा राजकीय इतिहास पाहिला तर ही जागा शिवसेनेचा गड मानली जाते. शिवसेना हा गड राखणार का ? हा प्रश्न इथे विचारला जात आहे.

News18 Lokmat | Updated On: May 22, 2019 02:16 PM IST

रामटेक लोकसभा निवडणूक : शिवसेना आणि काँग्रेसचा सामना

रामटेक, 18 मे : विदर्भातली रामटेकची जागा अनुसूचित जातीजमातींसाठी राखीव आहे. इथे शिवसेनेचे कृपाल तुमाने आणि काँग्रेसचे किशोर गजभिये यांच्यात सामना पाहायला मिळाला.

रामटेकचा राजकीय इतिहास पाहिला तर ही जागा शिवसेनेचा गड मानली जाते. त्याआधी इथे काँग्रेसचं वर्चस्व होतं. आताही याच दोन पक्षांमध्ये ही लढत झाली.

मागच्या निवडणुकीत सेनेचं कमबॅक

1999 पासून शिवसेनेला सलग विजय मिळाला आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे रामटेक ही शिवसेनेची जागा आहे, असं म्हणत होते.पण 2009 मध्ये काँग्रेस इथे पुन्हा आलं. काँग्रेसचे मुकुल वासनिक इथून खासदार झाले आणि केंद्रात मंत्री बनले.

काँग्रेसने लावला जोर

Loading...

या निवडणुकीत ही जागा अनुसूचित जातीजमातींसाठी राखीव आहे. इथे काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी जोर लावला होता. विदर्भात रामटेकमध्ये पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला मतदान झालं. इथे 51. 72 टक्के मतदानाची नोंद झाली.

नरसिंहराव यांचा मतदारसंघ

रामटेक लोकसभा मतदारसंघातून माजी पंतप्रधान नरसिंह राव यांनी निवडणूक लढवली आणि इथून ते जिंकूनही आले. 1984 आणि 1989 मध्ये नरसिंह राव इथूनच संसदेत पोहोचले आणि पंतप्रधान झाले.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी या जागेवर ताबा मिळवला. कृपाल तुमाने यांना 5 लाख 19 हजार 892 मतं मिळाली. तर मुकुल वासनिक यांना 3 लाख 44 हजार 101 मतं मिळाली. बसपा इथे तिसऱ्या स्थानावर होती.

23 मे ला निकाल

रामटेक लोकसभा निवडणुकीत काटोल, सावनेर, हिंगणा, उमरेड, कामठी आणि रामटेक हे विधानसभा मतदारसंघ आहेत.या मतदारसंघांत मतदार कुणाला कौल देतात ते 23 मे ला कळेल.

======================================================================

या आहेत आतापर्यंतच्या टाॅप 18 बातम्या, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 18, 2019 06:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...