VIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर?,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले

VIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर?,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले

मंत्र्यांच्या स्वागतासाठी आलेले शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी दिघे यांना मात्र मंत्री महोदयांनी चांगलेच फैलावर घेतले.

  • Share this:

हरिष दिमोटे, 15 आॅक्टोबर : आज शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. राज्यात प्लॅस्टिकबंदी झालेली असताना शिर्डीत मात्र मंदिर परीसरात आणि गावात सर्रासपणे प्लॅस्टिकचा वापर होत असल्याचं पाहून रामदास कदम चांगलेच भडकले.

रामदास कदम अचानक आज शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आले तेंव्हा काही साईभक्तांच्या हात प्लास्टिकच्या पिशवीत भरलेला प्रसाद बघून त्यांच्यावर कारवाई करण्याचा आदेश त्यांनी दिला मात्र आम्हाला दुकानातूनच जर प्लॅस्टिकच्या पिशवीत प्रसाद मिळत असेल तर आम्ही काय करणार असा पवित्रा भक्तांनी घेतला.

मंत्र्यांच्या स्वागतासाठी आलेले शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी दिघे यांना मात्र मंत्री महोदयांनी चांगलेच फैलावर घेतले. विशेष म्हणजे तुमचा बंड्या नावाचा माणूस दुकानदारांकडून दोन दोन हजार रूपये हप्ता घेत असल्याचं मंत्री महोदय म्हणताहेत.

साई संस्थानमध्येही सर्रास प्लास्टिकचा वापर केला जातोय अनेकदा सांगूनही संस्थान काही दखल घेत नाही आता जर साई संस्थानने प्लास्टिकचा वापर केला तर त्यांच्यावरही कारवाई करण्याचा इशारा रामदास कदम यांनी दिलाय.

आता मंत्र्यांनीच तंबी दिलीय यानंतर तरी शिर्डी शहरात आणी मंदिर परीसरात प्लास्टिकचा वापर बंद होईल का हा खरा प्रश्न आहे.

=========================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 15, 2018 09:34 PM IST

ताज्या बातम्या