News18 Lokmat

"संमेलन घ्यायचंच असेल तर राम रहीमचं आश्रमही रिकामचं आहे"

प्रसिद्ध वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांनी मात्र संमेलन आश्रमातच घ्यायचं असेल तर गुरमीत रामरहीम बाबाचं आश्रमही रिकाम झाल्याचं शेलक्या भाषेत टीका केली.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 11, 2017 08:36 PM IST

हलिमा कुरेशी, पुणे

11 सप्टेंबर : बुलढाणा येथील हिवरा आश्रमात होणाऱ्या ९१ व्या साहित्य संमेलनाला माजी  संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस आणि संमेलनाध्यक्ष पदाच्यासाठी इच्छुक असलेले साहीत्यिक राजन खान यांनी पाठिंबा दिलाय. तर प्रसिद्ध वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांनी मात्र संमेलन आश्रमातच घ्यायचं असेल तर गुरमीत रामरहीम बाबाचं आश्रमही रिकाम झाल्याचं शेलक्या भाषेत टीका केली.

बुलढाणा सारख्या ग्रामीण भागात संमेलन होणे स्वागतार्ह आहे.

आखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेतलेल्या  तथाकथित बाबाचा काही वर्षांपूर्वी निधन झालं आहे. हिवरा आश्रम अनेक विधायक काम होत असून, तांत्रिकदृष्ट्या तिथे सर्व सोयी आहेत. बहुमताने  साहित्य महामंडळाने जागा निश्चित केल्याचं श्रीपाल सबनीस आणि राजन खान यांनी म्हटलंय.

तर ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब कसबे यांनी हिवरा आश्रमात संमेलन होत असेल तर आपण संमेलनाला जाणार नाही. या जागेचा पुनर्विचार करावा अशी विनंती साहित्य महामंडळाकडे केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 11, 2017 08:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...