'शरद पवारांचा EVM वर संशय, पण आमचा पवारांवर संशय नाही'

ईव्हीएमबाबत शरद पवार यांनी अनेकदा संशय व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे, अजित पवार यांनी मात्र ईव्हीएमविरोधात भूमिका घेणं टाळलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 12, 2019 11:24 AM IST

'शरद पवारांचा EVM वर संशय, पण आमचा पवारांवर संशय नाही'

मुंबई, 12 जून : 'शरद पवार साहेबांचा ईव्हीएम मशीनवर संशय आहे. पण आमचा पवार साहेबांवर संशय नाही. त्यांनी महायुतीत यावे,' असं म्हणत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पवारांना टोला लगावला आहे. वसईत इथं रामदास आठवले यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी आठवलेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

ईव्हीएमबाबत शरद पवार यांनी अनेकदा संशय व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे, अजित पवार यांनी मात्र ईव्हीएमविरोधात भूमिका घेणं टाळलं आहे. याबाबतच बोलताना आठवले म्हणाले की, ईव्हीएमबाबत अजित पवार यांचीच भूमिका योग्य आहे.

राज ठाकरेंसह वंचितवरही हल्लाबोल

राज ठाकरे यांची मनसे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित आघाडीवर रामदास आठवले यांनी टीका केली आहे. मनसे आणि वंचित हे दोघेही स्वबळावर निवडून येऊ शकत नाही, असं आठवले यांनी मह्टलं आहे.

दरम्यान, कोल्हापूरमध्येही रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीवर टीका करत प्रकाश आंबेडकरांना सल्लावजा ऑफरच दिली होती. वंचितांना सत्तेपासून वंचित ठेवणारी अशी वंचित आघाडी आहे. त्यामुळे आंबेडकरांना सत्ता हवी असेल तर एनडीएमध्ये यावं, असं आठवले यांनी म्हटलं आहे.

Loading...

युतीकडे जागांची मागणी

नुकतंच कोल्हापूरमध्ये बोलताना आठवले यांनी युतीकडे जागांची मागणी केली होती. एकीकडे शिवसेना आणि भाजपमध्ये जागावाटपावरून धुसफूस सुरू आहे. तर दुसरीकडे घटकपक्षांना 20 जागा हव्यात असून 20 पैकी 10 जागा आरपीआयला मिळाव्यात अशी मागणी रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी केली होती.


CycloneVayu: बळीराजाची चिंता वाढणार, मान्सून आणखी लांबणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 12, 2019 11:24 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...