S M L

राज्यभर रामनवमी उत्साहात साजरी

विदर्भाची पंढरी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या शेगाव इथल्या श्री गजानन महाराजांच्या संत नगरीत आज रामनवमी निमित्त भक्तांची मोठी गर्दी झाली. राज्यभरातून शेकडो दिंड्या पायी चालत आज शेगावात दाखल झाल्या आहेत. लाखो भाविकांनी श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी केलीय

Chittatosh Khandekar | Updated On: Mar 25, 2018 07:04 PM IST

राज्यभर रामनवमी उत्साहात साजरी

24 मार्च: प्रभू श्रीरामचंद्रांची जयंती अर्थात चैत्रातील शुद्ध पक्षातील नवमी -राम नवमी आज राज्यभर उत्साहात साजरी झालीय. राज्यात अनेक ठिकाणी मंदिरांमध्ये रामाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.

विदर्भाची पंढरी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या शेगाव इथल्या श्री गजानन महाराजांच्या संत नगरीत आज रामनवमी निमित्त भक्तांची मोठी गर्दी झाली. राज्यभरातून शेकडो दिंड्या पायी चालत आज शेगावात दाखल झाल्या आहेत. लाखो भाविकांनी श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी केलीय.

कोकणातल्या किनाऱ्यावर एकमेव रामाचे मंदिर रत्नागिरी जिल्ह्यात पाजपंढरी गावात आहे. पाजपंढरी गावात राम नवमी उत्सव मोठ्या संख्येने साजरा केला जातो, राम नवमी निमित्त दरवर्षी या ठिकाणी मोठी जत्रा भरते. याहीवर्षी इथे मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली आहे.

तर मराठवाड्यातील बीड सह माजलगाव गेवराई तसंच परळीतल्या पुरातन मंदिरात रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. साखरेच्या गाठी, कैरीचे पन्हे असा प्रसाद रामनवमीच्या दिवशी प्रभूंना अर्पण केला जातो. या मंदिरातील रामचंद्रांची मूर्ती पंच धातूंची आहे.

वडाळातल्या राम मंदिरातही सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी रिघ लावलीय. रामनवमी निमित्त आज नाशिक शहरातील विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय.

Loading...
Loading...

नाशिकचे आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री काळाराम मंदिरात रामजन्मोत्सव, मिरवणूका कीर्तन आणि प्रवचन यांची रेलचेल पहायला मिळतेय. शिर्डीतही

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 25, 2018 07:04 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close