S M L

शिर्डीत रामनवमीचा उत्साह, दर्शनासाठी आज रात्रभर खुलं राहणार मंदिर

Samruddha Bhambure | Updated On: Apr 4, 2017 03:17 PM IST

शिर्डीत रामनवमीचा उत्साह, दर्शनासाठी आज रात्रभर खुलं राहणार मंदिर

03 एप्रिल :  साईबाबांच्या शिर्डीत तीन दिवस चालणाऱ्या रामनवमी उत्सवाला कालपासुन सुरूवात झाली आहे. रामनवमी उत्सवाच्या आज मुख्य दिवशी साईसमाधीच्या दर्शनासाठी राज्याभरातून पालख्याही दाखल झाल्या आहेत. साईबाबांचं मंदिर आज रात्रभर दर्शनासाठी खुलं राहणार आहे.

पहाटे साईबाबांच्या काकड आरतीने उत्सवाला सुरूवात झाली  आणि साईबाबांच्या पादुकांची मिरवणूक काढण्यात आली. आज होणारी गर्दी लक्षात घेऊन साईसंस्थान प्रशासनाने नियोजन केलं आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेता, संस्थांन प्रशासनाने दर्शन रांगेसह ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची तसंच मंडपाची व्यवस्था केली आहे.

रामनवमीच्या निमित्ताने आज साईमंदिरात दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यात प्रामुख्याने   समाधी मंदिराशेजारील स्टेजवर श्रीरामजन्म किर्तन कार्यक्रमासह रामजन्म साजरा केला जाईल. त्याचबरोबर दुपारी ४.०० वा. निशाणांची मिरवणूक तर सायं.५.०० वा. श्रींच्या रथाची गावातून मिरवणूक होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 4, 2017 03:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close