'राम कदमांची जीभ छाटा, 5 लाख घेऊन जा', माजी मंत्र्यांचं वक्तव्य

News18 Lokmat | Updated On: Sep 6, 2018 09:21 PM IST

'राम कदमांची जीभ छाटा, 5 लाख घेऊन जा', माजी मंत्र्यांचं वक्तव्य

बुलडाणा, 06 सप्टेंबर : राम कदमांची जीभ छाटणाऱ्याला पाच लाख रुपये बक्षीस देणार असं वादग्रस्त आवाहन माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी केलंय. शिवरायांच्या महाराष्ट्रात आमदार म्हणून राम कदम यांनी कलंकीत संदेश दिलाय. त्यांची जीभ छाटून आणणाऱ्याला पाच लाख बक्षीस देणार असंही सावजी जाहीरच केलंय.

घाटकोपर इथं राम कदम यांनी दहीहंडीचे आयोजन केले होते. यावेळी राम कदम यांनी तरुणांशी संवाद साधत असताना लग्नासाठी मुलगी तयार नसेल तर पळवून नेण्यास मदत करणार असल्याचं सांगत आपला मोबाईल नंबर तरुणांना दिला.त्यांच्या या विधानानंतर महाराष्ट्रभरातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येतोय.

बुलडाण्यातील काँग्रेसचे नेते आणि माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी खळबजनक विधान केलंय. जाहीर आवाहन जाहीर आवाहन...राम कदम यांची जीभ छाटा आणि पाच लाख रुपये घेऊन जा असं आवाहनच सावजी यांनी केलं.

शिवरायांच्या या महाराष्ट्रात भाजपचे आमदार राम कदम यांनी महिलांबद्दल चुकीचे वक्तव्य करून महिलांचा अपमान केला. आमदार म्हणून त्यांनी कलंकीत संदेश दिलाय. हे त्यांना शोभणीय नाहीये. म्हणून महाराष्ट्रात कुणीही पुढे या आणि राम कदमांची जीभ छाटून आणा आणि पाच लाख घेऊन जा असं सावजी म्हणाले.

ते एवढ्यावर थांबले नाही, त्यांच्या पत्नीने त्यांना पोट कमी करण्याचा सल्ला दिला होता. पण त्यांनी मनसेतून भाजपमध्ये आले त्याचा अर्थ त्यांना कळला नाही अशी टीकाही सावजींनी केली.

राम कदम यांना तारत्म्य नाही. सुबुद्धी नाही आणि विचारही नाही. फक्त लोकांना काही तरी सांगायचं आणि लोकांची डोकी भडकावण्यासाठी वक्तव्य करायचं एवढंच काम राम कदमांकडून केलंय जातंय. हे आता चालणार नाही म्हणून मी हे आवाहन केलं असंही सावजी यांनी सांगितलं.

----------------------------------------

VIDEO : फक्त हात लावूनच दाखवा, पुण्याच्या तरूणीचं राम कदम यांना खुलं आव्हान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 6, 2018 09:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close