साताऱ्यात अनोखे रक्षाबंधन, बहिणीने स्वतःची किडनी भावाला देऊन वाचवले प्राण

रक्षाबंधन... भाऊ बहिणींच्या पवित्र नात्यांचे धागे अधिक घट्ट करण्याचा दिवस

News18 Lokmat | Updated On: Aug 25, 2018 02:23 PM IST

साताऱ्यात अनोखे रक्षाबंधन, बहिणीने स्वतःची किडनी भावाला देऊन वाचवले प्राण

विकास भोसले, सातारा, २५ ऑगस्ट- देशभरात रक्षाबंधन उत्साहात साजरी करण्याची लगबग सुरु आहे. भावाला काय भेटवस्तू द्यायची या विचारात आहेत. मात्र सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शेरे संजयनगर येथील एका बहिणीने भावाला एक अशी भेटवस्तू दिली जी आजन्म त्याच्याजवळच राहील. सचिन गोसावी या तरुणाला त्याच्या बहिणीने स्वतःची किडणी देऊन आपल्या भावाची खऱ्या अर्थाने रक्षा केली.

रक्षाबंधन... भाऊ बहिणींच्या पवित्र नात्यांचे धागे अधिक घट्ट करण्याचा दिवस. मात्र सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शेरे संजय नगर इथे राहणारे सचिन गोसावी यांचे सात जणांचे कुटुंब गेली २ वर्ष मरण यातना भोगत आहेत. शेत जमीन नाही, रोजगार व मासेमारी करुन पोट आलेला दिवस ढकलला जातो.

सगळा भार घरातील कमवता मुलगा सचिन याच्यावरच. मात्र सचिनला मासेमारी करत असताना दोन वर्षांपुर्वी सर्पदंश झाला आणि गरिबीमुळे योग्य उपचार न झाल्याने दोन वर्षात सचिनच्या दोनही किडन्या पूर्ण निकामी झाल्या. २ वर्षे डायलेसिस सुरु असल्यामुळे त्याच्या वडिलांना राहते घरदेखील विकावे लागले. मात्र आपला तरुण मुलगा दररोज मरणाच्या दारात असल्याचे दु:ख बाप पाहत होता.

सचिन सध्या डायलेसिसवर असून कोल्हापूर येथील डायमंड रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डॉक्टरांनी त्याला तातडीने किडणी प्रत्यारोपनांचा सल्ला दिला. सचिनला किडनीची गरज होती मात्र ती देणार कोण हा मोठा प्रश्न सर्वांसमोर होता. अखेर सचिनची बहिण सुवर्णाने आपली किडणी देण्याचा निर्णय घेतला. आपली एक किडणी देऊन सुवर्णाने सचिनला कधीही विसरता येणार नाही अशी रक्षाबंधनची भेट दिली.

समाजात मालमत्तेवरुन भाऊ बहिणीत कटुता निर्माण होण्याची अनेक उदाहरणं डोळयासमोर असताना, सुवर्णाने रक्षाबंधन दिवशी आपल्या भावाला यमाच्या दारातून परत आणण्यासाठी केलेली धडपड नक्कीच प्रेरणादायी आहे.

Loading...

VIDEO : 'रॅम्बो' त्याच्याजवळ येऊन थांबला आणि खुनी सापडला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 25, 2018 02:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...