चंद्रकांत पाटलांसारखे कित्येक मंत्री आले आणि गेले, राजू शेट्टींची पलटवार

चंद्रकांत पाटलांसारखे कित्येक मंत्री आले आणि गेले, राजू शेट्टींची पलटवार

'चंद्रकांत पाटील हे आता आताच राजकारणात आले आहे. त्यामुळे त्यांचा इतिहास कच्चा आहे'

  • Share this:

परभणी, 08 जुलै : चंद्रकांत पाटलांसारखे कित्येक मंत्री-संत्री आले गेले मी ४ मुख्यमंत्र्यांबरोबर संघर्ष केलाय, त्यामुळे मला काहीच फरक पडत नाही अशी जोरदार टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी चंद्रकांत पाटलांवर केलीय तर मुंबईला दुधाचा एक थेंबही पुरवठा होऊ देणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

राजू शेट्टी आज परभणीत होते. यावेळी त्यांनी मागच्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पीक विमा आंदोलनकांची भेट घेऊन हा विषय दिल्लीत अधिवेशनात मांडणार असल्याचं सांगत दूध आंदोलनावरून चंद्रकांत पाटलांवर जोरदार टीका केलीय.

'दूध रोखायला मुंबई काय पाकिस्तानात आहे का?'

चंद्रकांत पाटलांच्या अज्ञात भर टाकतो. 11 वर्षांपूर्वी जुलै 2007 रोजी माझ्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात दूध बंद आंदोलन माझ्या नेतृत्वाखाली झालं होतं आणि ते यशस्वी झालं होतं. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख अमेरिकेच्या दौऱ्यातून होते. त्यावेळी त्यांनी अमेरिकेतून फोन करून मला आंदोलन मागे घेण्यास विनंती केली होती. आता चंद्रकांत पाटील हे आता आताच राजकारणात आले आहे. त्यामुळे त्यांचा इतिहास कच्चा आहे, त्यांच्या सारखे अनेक मंत्री मी पचवले आहे असा टोला राजू शेट्टींनी लगावला.

तसंच राज्यातील शेतकऱ्यांकडून कोण ठेकेदारी घेतं हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे अधिक काही बोलायला लागले तर मला बरंच काही बाहेर काढताय येईल असंही राजू शेट्टी म्हणाले.

तसंच दूध बंद आंदोलन शंभर टक्के होणारच आहे. महाराष्ट्रातल्या दूध उत्पादकांनी निर्णय घेतला असून जर कुणी जबरदस्ती केली तर जशाच तसे उत्तर दिले जाईल असा इशाराही राजू शेट्टींनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 8, 2018 05:03 PM IST

ताज्या बातम्या