4 जुलैपर्यंत समितीसमोर हजर व्हा,अन्यथा...;'स्वाभिमानी'चा सदाभाऊंना अल्टिमेटम

4 जुलैपर्यंत समितीसमोर हजर व्हा,अन्यथा...;'स्वाभिमानी'चा सदाभाऊंना अल्टिमेटम

सदाभाऊ खोत यांना संघटनेत ठेवायचं की नाही याबद्दल आता समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती सदाभाऊंना खुलासा विचारतील आणि 4 जुलैपर्यंत निर्णय घेणार आहे असं राजू शेट्टींनी स्पष्ट केलं.

  • Share this:

28 जून : स्वाभिमानी शेतकरी संघटनेत राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत या दोन शिलेदारांचा वाद आता चांगलाच पेटलाय. सदाभाऊ खोत यांना संघटनेत ठेवायचं की नाही याबद्दल आता समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती सदाभाऊंना खुलासा विचारतील आणि 4 जुलैपर्यंत निर्णय घेणार आहे असं राजू शेट्टींनी स्पष्ट केलं.

शरद जोशींच्या शेतकरी संघटनेत फूट पाडत राजू शेट्टींनी स्वाभिमानी शेतकरी संघटना सुरू केली. पण आता या संघटनेत उभी फूट पडलीये. गेल्या काही दिवसांपासून राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यामध्ये शीतयुद्ध रंगलंय. एवढंच नाहीतर राजू शेट्टी यांनी सदभाऊ खोत यांना गद्दार घोषित केलंय. त्यातच शेतकरी संपावर दोन्ही नेत्यांमध्ये वाद विकोपाला गेला. आता सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी संघटनेतून हकालपट्टी करण्याची हालचाल सुरू झालीये.

आज खुद्द राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेऊन सदाभाऊ खोत यांना 4 जुलैपर्यंत अल्टिमेटम दिलाय. सदाभाऊंचा निर्णय घेण्यासाठी  एक समिती स्थापन करण्यात आली आहे. स्वाभिमानीची राजकीय समितीच्या तक्रारींवर सदाभाऊना खुलासा विचारतील. या समितीत प्रकाश पोकळे,रविकांत तुपकर,सतीश काकडे,दशरथ सावंत हे सदस्य असणार आहे. सदाभाऊंचा निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार या समितीला असणार आहे असं राजू शेट्टी यांनी सांगितलं.

तसंच सदाभाऊ खोत यांना बोलवून जाब विचारा आणि त्यानंतर  ४ जुलैपर्यंत निर्णय घेणार असं राजू शेट्टींनी स्पष्ट केलं. तसंच  सरकारमध्ये राहायच की नाही याचा निर्णय २५ जुलैला घेणार असल्याची घोषणाही राजू शेट्टींनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 28, 2017 06:39 PM IST

ताज्या बातम्या