थेंब थेंब पाण्यासाठी रक्ताचे पाट वाहू- राजू शेट्टी

भंडारा आणि नागपूर जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांना पाणी देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

Sonali Deshpande | Updated On: Aug 20, 2017 07:45 PM IST

थेंब थेंब पाण्यासाठी रक्ताचे पाट वाहू- राजू शेट्टी

नागपूर, 20 आॅगस्ट : पेंच प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत पळवले आहे. थेंब थेंब पाण्यासाठी रक्ताचे पाट वाहू पण आता गप्प बसणार नाही असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे. अच्छे दिनचे स्वप्न दाखविणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांचे मार्गदर्शक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जाब विचारावा असेही शेट्टी म्हणाले.

भंडारा आणि नागपूर जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांना पाणी देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पेंच आणि तोतलाडोह या धरणातून पाणी न सोडल्यामुळे जवळपास दोन लाख नव्वद हजार हेक्टरवरील भातपिकांची लावणी खोळंबली आहे. आधीच पाऊस लागल्याने संकटात असणाऱ्या शेतकऱ्यांवर दुहेरी संकट आले आहे. यासाठी आयोजित केलेल्या सभेला राजू शेट्टी संबोधित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 20, 2017 07:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close