• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: दिलीप गांधींच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजू शेट्टी आक्रमक
  • VIDEO: दिलीप गांधींच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजू शेट्टी आक्रमक

    News18 Lokmat | Published On: Jan 15, 2019 03:01 PM IST | Updated On: Jan 15, 2019 03:01 PM IST

    अहमदनगर, 15 जानेवारी : महागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. यानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी हेदेखील आक्रमक झाले आहेत. 'मोदींचीच सवय आता त्यांच्या इतर नेत्यांनाही लागली,' अशी टीका शेट्टी यांनी केली आहे. महागाई वाढली असा प्रश्न विचारला असता दिलीप गांधी यांनी आक्रमक होत त्या शेतकऱ्यालाच सुनावलं. दरम्यान, यापुर्वीही मनपा निवडणुकीत मंत्री पंकजा मुंडे यांच्यासमोर भरसभेत गांधी यांनी मतदारांना दमबाजी केली होती. त्यानंतर आता दिलीप गांधी पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी