अंगावर येणाऱ्यांना शिंगावर घेईन, राजू शेट्टींचा इशारा

अंगावर येणाऱ्यांना शिंगावर घेईन, राजू शेट्टींचा इशारा

सदाभाऊंबाबत समिती जो काही निर्णय घेईल तो त्यांना मान्य करावाच लागेल असंही राजू शेट्टींनी ठणकावून सांगितलं.

  • Share this:

23 जुलै : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची चौकशी समिती जो निर्णय घेईल तो सदाभाऊ खोत यांना मान्य करावाच लागेल असं खासदार राजू शेट्टी यांनी ठणकावून सांगितलंय. शिस्तीसाठी आणि चळवळीसाठी कोणालाही अंगावर घेण्याची तयारी आहे असं म्हणत राजू शेट्टींनी रघुनाथदादा पाटील यांच्यावर टीका केली.

स्वाभिमानी संघटनेमध्ये राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत या दोन शिलेदारांमधला वाद आता विकोपाला गेलाय. स्वाभिमानींनी स्थापन केलेल्या समितीसमोर हजर झाले होते. ही शेवटची चौकशी असून आता तुम्हाला काय निर्णय घ्यायचा असेल तर घ्या अशा इशारा दिला होता. आज राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत आणि रघुनाथदादा पाटील यांच्या टीकेला उत्तर दिलं.

स्वाभिमानी संघटना ही शिस्तबद्ध संघटना आहे. सदाभाऊ बाबत समिती जो काही निर्णय घेईल तो त्यांना मान्य करावाच लागेल असंही राजू शेट्टींनी ठणकावून सांगितलं.

तसंच आतापर्यंत अनेकांना अंगावर घेतलं. त्यामुळे कुणालाही अंगावर घ्यायला घाबरणार नाही असा पलटवार राजू शेट्टींनी रघुनाथ पाटील यांच्यावर केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 23, 2017 04:21 PM IST

ताज्या बातम्या