राजू शेट्टींचा एनडीएशी काडीमोड, महायुतीतून पडले बाहेर

राजू शेट्टींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन एनडीएमधून बाहेर पडण्याबाबतचं पत्र दिलंय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 4, 2017 08:00 PM IST

राजू शेट्टींचा एनडीएशी काडीमोड, महायुतीतून पडले बाहेर

04 सप्टेंबर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आता एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय.  राजू शेट्टींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन  एनडीएमधून बाहेर पडण्याबाबतचं पत्र दिलंय.

राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यातील वादावर पडदा पडल्यानंतर अखेर आता राजू शेट्टींनी एनडीएला सोडचिट्टी दिलीये.  स्वाभिमानी संघटना शेतकाऱ्यांच्या प्रश्नावर भांडतेय. पण महायुतीत सामील होऊनही गेल्या साडेतीन वर्षात शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू शकले नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यात, कर्ज वाढतंय , पिकाला हमी भाव नाही म्हणून महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय़ घेतला अशी असं राजू शेट्टींनी जाहीर केलं.

तसंच स्वाभिमानीच्या वाटयाला आलेलं एक मंत्रिपद आणि महामंडळ अध्यक्षाच पदही परत करणार असल्याचं शेट्टींनी जाहीर केलं. राज्य आणि केंद्रात मजबूत शेतकरी चळवळ उभी करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 4, 2017 08:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...