एकरकमी एफआरपी द्या, नाहीतर संघर्ष अटळ -राजू शेट्टी

आज जयसिंगपूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भव्य ऊस परिषद झाली.

News18 Lokmat | Updated On: Oct 27, 2018 09:57 PM IST

एकरकमी एफआरपी द्या, नाहीतर संघर्ष अटळ -राजू शेट्टी

विकास भोसले, प्रतिनिधी

कोल्हापूर, 27 आॅक्टोबर : मागिल वर्षीच्या फॉर्म्युल्यानुसार आधारीत एफआरपीमध्ये अधिकचे 200 रूपये दिल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फार्म्युला आम्हाला मान्य असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलंय. मात्र त्यासाठी आधी मुख्यमंत्र्यांनी जीआर काढावा अशी मागणी देखील राजू शेट्टी यांनी ऊस परिषदेत केलीय.

आज जयसिंगपूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भव्य ऊस परिषद झाली. यामध्ये विविध मागण्या करण्यात आल्या. यावेळी शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

ऊस शेतकऱ्यांना साडे नऊ टक्के बेसनुसार एफआरपी द्यावा, 10 टक्के बेसनुसार एफआरपीस आमचा विरोध असल्याचंही राजू शेट्टींनी ठणकावून सांगितलंय. एकरकमी एफआरपी द्यावा अन्यथा संघर्ष अटळ आहे असा इशाराही त्यांनी दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या तत्व उपस्थितीत झालेल्या ऊस परिषदेत अशीच मागणी झाली होती. माञ, शासनाने एफआरपीत छेडछाड  करून बेस बदलून दहा केला होता. फक्त हा बेस बदलावा अशी मागणीही राजू शेट्टी यांनी केली.

Loading...

उसाच्या एफआरपीबाबत शासनाने परिपत्रक काढावे आणि कारखान्यांनी दर जाहीर करावा तोपर्यंत कारखाने चालू होऊ देणार नाही अशा इशाराही राजू शेट्टींनी दिला.

शेतकऱ्याच्या विविध मागण्यांसाठी 30 नोव्हेंबरला संसदेवर मोर्चा काढणार असल्याचा इशारा देण्यात आला.

यावेळी वस्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टी यांची नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रमाणे हत्या करण्यात येणार असल्याचा गंभीर आरोप केला.

======================

VIDEO: मुंबईच्या लोकलमध्ये आत्महत्येचा प्रयत्न, क्षणात संपलं असतं आयुष्य पण...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 27, 2018 09:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...