'प्रत्यक्ष मतदानापेक्षा 459 जास्त मते मोजली गेली', राजू शेट्टींच्या आरोपाने खळबळ

'प्रत्यक्ष मतदानापेक्षा 459 जास्त मते मोजली गेली', राजू शेट्टींच्या आरोपाने खळबळ

ईव्हीएमद्वारे झालेलं मतदान आणि निकालावेळी मोजली गेलेल्या मतांची संख्या यात तफावत असल्याचा शेट्टी यांचा आरोप आहे.

  • Share this:

हातकणंगले, 31 मे : 'हातकणंगले मतदारसंघात प्रत्यक्ष मतदानापेक्षा मतमोजणीनंतर 459 मते जास्त मोजली गेली आहेत,' असा धक्कादायक आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि हातकणंगलेमधील पराभूत उमेदवार राजू शेट्टी यांनी केला आहे. तसंच याबाबत त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली आहे.

सत्ताधारी भाजपकडून ईव्हीएममध्ये घोटाळा केला जात आहे, असा आरोप याआधी अनेकांकडून करण्यात आला आहे. त्यानंतर राजू शेट्टी यांनीही याबाबत आता शंका उपस्थित केली आहे. ईव्हीएमद्वारे झालेलं मतदान आणि निकालावेळी मोजली गेलेल्या मतांची संख्या यात तफावत असल्याचा शेट्टी यांचा आरोप आहे.

"हातकणंगले मतदारसंघात ईव्हीएमद्वारे 12 लाख 45 हजार 797 एवढं मतदान झालं. पण नंतर ईव्हीएममधून 12 लाख 46 हजार 256 एवढी मते मोजली गेली. म्हणजे एकूण 459 मते जास्त मोजली गेली आहेत. यामध्ये पोस्टलची मते धरलेली नाहीत," असं राजू शेट्टी यांचं म्हणणं आहे.

दरम्यान, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मागील 10 वर्षांपासून खासदार असलेले शेतकरी नेते राजू शेट्टी यांना यंदा पराभवाचा सामना करावा लागला. लोकसभा निवडणुकीत सर्वांना आश्चर्याचा धक्का देत शिवसेनेच्या धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांचा पराभव केला.

गेल्या निवडणुकीत राजू शेट्टी यांचा पक्ष भाजपसोबत होता. पण ही निवडणूक मात्र त्यांनी आघाडीसोबत लढवली. निवडणुकीत हार झाली असली तरी शेतकऱ्यांच्या हितासाठीचं राजकारण आपण सुरूच ठेवणार आहोत, असं राजू शेट्टी म्हणतात. याबाबतची एक कविताही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली होती.


VIDEO : अवमान झाल्याने शरद पवारांनी मोदींच्या शपथविधीला जाणं टाळलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 31, 2019 09:27 AM IST

ताज्या बातम्या