कोल्हापूर ते मुंबई पायी चालत जाणार,राजू शेट्टींची आत्मक्लेश आंदोलनाची घोषणा

महात्मा फुले ज्याप्रमाणे इंग्रज राज्यपालाकडे शेतकऱ्याच्या वेशात गेले होते त्याप्रमाणे राजू शेट्टी मे महिन्याच्या कडक उन्हातही आता हे आत्मक्लेश आंदोलन करणार आहेत

Sachin Salve | Updated On: May 4, 2017 07:35 PM IST

कोल्हापूर ते मुंबई पायी चालत जाणार,राजू शेट्टींची आत्मक्लेश आंदोलनाची घोषणा

संदीप राजगोळकर, कोल्हापूर

04 मे : राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीवर आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालीय. येत्या 22 मे पासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी हे कोल्हापूरपासून मुंबईला चालत जाऊन राज्यपालांना आपल्या मागण्यांचं साकडं घालणार आहेत.

महात्मा फुले ज्याप्रमाणे इंग्रज राज्यपालाकडे शेतकऱ्याच्या वेशात गेले होते त्याप्रमाणे शेट्टी मे महिन्याच्या कडक उन्हातही आता हे आत्मक्लेश आंदोलन करणार आहेत. आज कोल्हापूरमध्ये कर्जमाफीच्या मागण्यांसोबतच इतर मागण्यांबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं कोल्हापूरमधल्या दसरा चौकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढला.

या मोर्चामध्ये भर उन्हातही शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. या मोर्चावेळी शेट्टी यांनी ही घोषणा केलीय. तसंच ऊसाला 500 रुपये जादा दर द्यावा नाहीतर साखर कारखान्यांच्या गोडाऊनमधून येत्या 22 तारखेपासून साखर बाहेर पडू देणार नाही असा इशाराही शेट्टी यांनी दिलाय.

दरम्यान, या मोर्चाला सदाभाऊ खोतही उपस्थित होते. त्यांनीही आपल्या भाषणात मी शेतकऱ्यांचे प्रश्न हे प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करतोय, मी चळवळीतून निर्माण झालेला नेता असून मुख्यमंत्रीही एक प्रकारे कर्जमाफीसाठी सकारात्मक असल्याचं स्पष्ट केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 4, 2017 07:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close