मनसेला सोबत घेण्याची शेट्टींची इच्छा, अन्यथा पुढे येऊ शकतो हा नवा राजकीय पर्याय

मनसेला सोबत घेण्याची शेट्टींची इच्छा, अन्यथा पुढे येऊ शकतो हा नवा राजकीय पर्याय

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतल्याने मनसेला आघाडीसोबत घेण्याच्या प्रक्रियेला पुन्हा एकदा गती मिळाली आहे.

  • Share this:

चंद्रकांत फुंदे, (प्रतिनिधी)

पुणे, 4 जुलै- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतल्याने मनसेला आघाडीसोबत घेण्याच्या प्रक्रियेला पुन्हा एकदा गती मिळाली आहे. राजू शेट्टी यांनी मनसेला महाआघाडीत घेण्यासाठी शेट्टींचा पुढाकार घेतला आहे. काँग्रेस आता तरी मनसेला सोबत घेणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. स्वाभिमानीकडूनही या चर्चांना दुजोरा मिळाला आहे.

राजू शेट्टींनी यांनी गुरूवारी 'कृष्णकुंज'वर जाऊन राज ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली. यावेळी दोन्ही पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे महाआघाडीत मनसेला सामावून घेण्याच्या राजकीय चर्चांना पुन्हा वेग आला आहे. विशेष म्हणजे खुद्द राजू शेट्टी यांनी मनसेला सोबत घेण्याची इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीनेही यापूर्वीच मनसेला विधानसभेसाठी सोबत घेण्याची भूमिका जाहीरपणे मांडली होती. अशातच आता स्वाभिमानीनेही त्यासाठी आग्रह धरल्याने विरोधकांची मोट आणखी बळकट होऊ शकते. पण त्यासाठी काँग्रेस हायकमांडने हिरवा कंदिल दाखवणे तितकेच महत्त्वाचे आहे. तरंच हे राजकीय समीकरण जुळून येऊ शकते.

मनसेला महाआघाडीसोबत घेण्याची शेट्टींची इच्छा असली तर कॉंग्रेसकडून त्याला होकार मिळणे महत्त्वाचे आहे. कॉंग्रेसकडून होकार न मिळाल्यास विधानसभेत नवा राजकीय पर्याय पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग राजू शेट्टी, राज ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस असाही एक नवा राजकीय पर्याय विधानसभेत पुढे येऊ शकतो. तसेही राजू शेट्टी यांनी 49 जागा लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. आता नेमके काय होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राजू शेट्टी-राज ठाकरेंचा विधानसभेचा प्लॅन ठरला? कृष्णकुंजवरील भेटीचा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 4, 2019 06:51 PM IST

ताज्या बातम्या