काश्मीरमध्ये पाकच्या गोळीबारात भंडाऱ्याचे मेजर प्रफुल्ल मोहरकर शहीद

जम्मु काश्मिरमधील राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात दोन जवान आणि एका अधिकाऱ्याला वीरमरण प्राप्त झाले.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 23, 2017 10:32 PM IST

काश्मीरमध्ये पाकच्या गोळीबारात भंडाऱ्याचे मेजर प्रफुल्ल मोहरकर शहीद

23 डिसेंबर : जम्मु काश्मिरमधील राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात दोन जवान आणि एका अधिकाऱ्याला वीरमरण प्राप्त झाले. यात भंडारा जिल्ह्यातील मेजर प्रफुल्ल मोहरकर यांचा समावेश आहे.

राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या सैन्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन करून भारतीय सैन्यावर गोळीबार केला त्यात तीन जण शहीद झाले. शहीद मेजर प्रफुल्ल मोहरकर, लान्स नायक गुरुमैल सिंग आणि शिपाही पारगत सिह असे शहिद जवांनाची नावे आहेत.

३२ वर्षीय शहीद प्रफुल्ल मोहरकर हे भंडारा जिल्ह्यातील रहिवाशी होते. मेजर मोहरकर हे भंडारा जिल्ह्यातल्या पवनीचे राहणारे होते. मोहरकर यांना वीरमरण आल्याचं वृत्त समजताच पवनी शहरावर शोककळा पसरलीय. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी अवनी मोहरकर आणि कुटुंबीय आहेत.

शहिद प्रफुल्ल मोहरकर यांचे पार्थिव लवकरच भारतीय सैन्य दलातर्फे भंडाऱ्यात आणले जाईल. संपूर्ण लष्करी इतमामात त्याच्या पार्थिवावर अंतिम संस्कार केले जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 23, 2017 10:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...