S M L

पालघर: श्रीनिवास वनगा यांचा पत्ता कट, राजेंद्र गावित यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश

राजेंद्र गावित हे आता पालघरमधून लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे.

Updated On: Mar 28, 2019 09:30 PM IST

पालघर: श्रीनिवास वनगा यांचा पत्ता कट, राजेंद्र गावित यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश

मुंबई, 26 मार्च : सोमवारी 'मातोश्री'वर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राजेंद्र गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता पालघरमधून राजेंद्र गावित हेच लोकसभेचे उमेदवार असणार आहे. तर श्रीनिवास वनगा यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. राजेंद्र गावित हे आता पालघरमधून लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे.

चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेनं परस्परांना आव्हान दिलं होतं. त्यावेळी श्रीनिवास वनगा यांनी भगवा हाती घेत शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी 2019च्या निवडणुकीमध्ये लोकसभेसाठी श्रीनिवास वनगा हे उमेदवार असतील असं जाहीर केलं होतं.

पण, पालघरची जागा ही भाजपकडे होती. शिवसेनेनं जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये मात्र पालघरचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे पालघरची जागा शिवसेनेकडे जाणार की भाजपकडे राहणार यावर सस्पेन्स होता.


लोकसभा निवडणुकीसाठी युतीच्या फॉर्मुल्याप्रमाणे शिवसेनेच्या 23 जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

शिवसेनेचे उमेदवार

1) दक्षिण मुंबई - अरविंद सावंत

Loading...

2) दक्षिण मध्य मुंबई - राहुल शेवाळे

3) उत्तर पश्चिम - गजानन कीर्तिकर

4) ठाणे - राजन विचारे

5) कल्याण - श्रीकांत शिंदे

6) रायगड - अनंत गिते

7) रत्नागिरी सिंधुदुर्ग - विनायक राऊत

8) कोल्हापूर - संजय मंडलिक

9) हातकणंगले - धैर्यशिल माने

10) नाशिक - हेमंत गोडसे

11) शिर्डी - सदाशिव लोखंडे

12) शिरुर - शिवाजीराव आढळराव-पाटील

13) औरंगाबाद - चंद्रकांत खैरे

14) यवतमाळ-वाशिम - भावना गवळी

15) बुलढाणा - प्रतापराव जाधव

16) रामटेक - कृपाल तुमाने

17) अमरावती- आनंदराव अडसूळ

18) परभणी- संजय जाधव

19) मावळ - श्रीरंग बारणे

20) हिंगोली-हेमंत पाटील

21) उस्मानाबाद-ओमराजे निंबाळकर

22) पालघर - राजेंद्र गावित

23) सातारा - नरेंद्र पाटील

लोकसभा निवडणुक 2019

लोकसभा निवडणुकांच्या (LokSabha Elections 2019) तारखा जाहीर झाल्या आहेत. देशभरात सात टप्प्यांमध्ये 11 एप्रिल ते 19 मे यादरम्यान निवडणुका होतील. नवी दिल्लीमध्ये रविवारी निवडणूक आयोगाने (Election Commission) या तारखांची घोषणा केली. देशात सात टप्प्यांत तर महाराष्ट्रात चार टप्प्यांत लोकसभा निवडणुका होतील.

11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान होणार-

वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा- गोदिया, गडचिरोली- चिमूड, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम

18 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 10 जागांवर होणार मतदान-

बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर

23 एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 14 जागांवर होणार मतदान

जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदूर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

29 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 17 जागांवर होणार मतदान

नंदूरबार, धुळे दिंडोरी, नाशिक, पालघर, भिंवडी, कल्याण, ठाणे, मुंबई- उत्तर, मुंबई- उत्तर- पश्चिम, मुंबई -उत्तर - पूर्व, मुंबई- उत्तर -मध्य, मुंबई - दक्षिण - मध्य, मुंबई- दक्षिण, मावळ, शिरूर, शिर्डी

लोकसभा निवडणूक 2014

महाराष्ट्रात 2014 च्या निवडणुकीत भाजप - शिवसेना युती आणि काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी अशी सरळ स्पर्धा होती. राज्यातल्या लोकसभेच्या 48 जागांपैकी 41 जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात भाजप- सेना युतीने जिंकल्या आणि काँग्रेस आघाडीचा सपशेल पराभव झाला. काँग्रेसला फक्त 2 जागा जिंकता आल्या तर राष्ट्रवादीने केवळ 4 जागा राखल्या.

महाराष्ट्र 2014 चं पक्षीय बलाबल

एकूण जागा 48

भाजप 23

सेना 18

राष्ट्रवादी काँग्रेस 4

काँग्रेस 2

स्वाभिमानी शेतकरी पक्ष 1


VIDEO: वहिनींशी पंगा घेऊ नका, तिच्याजवळ चार खासदार आहेत - सुप्रिया सुळे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 26, 2019 02:30 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

Vote responsibly as each vote
counts and makes a difference

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close